Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर मुहूर्त मिळाला, ‘या’ दिवशी होणार शपथविधी…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/08/2022
in राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read

विषेश वृत्त – राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या 38 दिवसांपासून रखडलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (दि. 9) सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्रीमंडळाचा हा संपूर्ण विस्तार नसून, पहिल्या टप्प्यात साधारण 15 मंत्र्यांचा शपथविधी होईल. मंत्रिमंडळात स्थान दिल्या जाणाऱ्या आमदारांना आज (ता. 8) सायंकाळपर्यंत मुंबईत पोचण्याचे निरोप पाठवल्याचे समजते. त्यामुळे या मंत्रिमंडळात नेमकी कुणाची वर्णी लागते, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच उद्या (मंगळवारी) सायंकाळी मंत्र्यांना खातेवाटप होणार असून, बुधवारी (ता. 10) कॅबिनेटची बैठकही होणार आहे.. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याचं समजतंय.. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच (ता. 9) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शिंदे सरकारमधील एकूण 15 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजपचे 8, तर शिंदे गटातील 7 आमदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना, तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना मंत्रीपदाची आधी संधी मिळणार असल्याचं समजते.. अर्थात, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.

संभाव्य मंत्रिमंडळ

भाजप

देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील
जयकुमार रावल
राधाकृष्ण विखे पाटील
प्रवीण दरेकर
रवींद्र चव्हाण
नीतेश राणे

शिंदे गट
गुलाबराव पाटील
दीपक केसरकर
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराजे देसाई
संजय शिरसाठ
संदीपान भुमरे

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आज विधान भवनाबाहेरील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलीय. विधान भवनात जाण्यासाठी सामान्य नागरिकांना मज्जाव केला जात आहे. पूर्ण चेकींग करुनच नागरिकांना सोडलं जात आहे. सुप्रिम कोर्टाचा निर्णय येण्यास उशीर लागण्याची शक्यता असल्याने शिंदे सरकारचा विस्तार होणार असल्याचे समजते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

Next Post

खुशखबर… खुशखबर….केद्रिंय कर्मचार्‍यांसाठी…खुशखबर…

Next Post

खुशखबर… खुशखबर….केद्रिंय कर्मचार्‍यांसाठी…खुशखबर...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo