<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे, कवी ना.धो.महानोर राजन गवस, कवियत्री प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, समीक्षक डॉ.दिलीप धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवर्तनाचे शंभू पाटील हर्षल पाटील हे उपस्थित होते. परिवर्तन सारखा साहित्य व नाटक यांच्या संगमातून इतका सुरेख महोत्सव देशात कुठेच होत नाही असे गौरवोद्गार भालचंद्र नेमाडे यांनी यावेळी काढले. तर ज्या सांस्कृतिक बीजाची रुजवात मी जळगाव मध्ये केली तेच काम परिवर्तन पुढे घेऊन जात आहे याचा मला आनंद आहे असं ना.धो.महानोर यावेळी म्हणाले. आजच्या व्यामिश्र जगण्यात अशाप्रकारे साहित्य व नाटकाला जोडून घेत असा महोत्सव जळगाव मध्ये होतो याचा खूप आनंद आम्हाला आहे असे उद्गार प्रभा गणोरकर यांनी काढले दिनांक २१ ते २८ आठ दिवस चालणाऱ्या परिवर्तन च्या अभिवाचन महोत्सवाची उत्सुकता आता सर्व स्तरात आहे या महोत्सवाला आमदार राजू मामा भोळे, सिविल इंगिनीर असोसिएशन आणि आर्यन पार्ट यांचे आर्थिक सहाय्य लाभलेले आहे. रोटी वेस्ट यांची मोलाची मदत या महोत्सवाला आहे. यावर्षीच्या महोत्सवात अतिशय वेगवेगळे विषय हाताळले जाणार आहेत. नाटक कविता व गझल चरित्र आत्मचरित्र इतिहास ललित लेखन अशा सर्वच विषयांना स्पर्श करणारे विविध अभिवाचन रसिकांना ऐकायला मिळणार आहेत या महोत्सवाचे उद्घाटन कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या कविता व गझला याने होणार आहे दिनांक २१रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रोटी वेस्ट मायादेवी नगर येथे हे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून रसिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख विनोद पाटील व मनोज पाटील यांनी केलेले आहे. या महोत्सवासाठी ज्ञानेश्वर शेंडे,निखील क्षीरसागर, अमित माळी, हर्षदा पाटील,जागृती भिडे,अनुषा महाजन, सुयोग गुरव, आदी लोक यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.