<
जळगाव-( जिमाका)– मा.भारत आयोगाच्या सुचनांनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहिम दि.01 ऑगस्ट 2022 पासून सुरु झालेली असून आतापर्यंत जळगाव जिल्हयात एकूण 7,40,445 मतदारांनी मतदार ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी केलेली आहे.
सदर कार्यक्रमात मतदारांचा सहभाग वाढावा या हेतुने मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणीसाठी दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी जिल्हाभरात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर दिवशी मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले मतदान केंद्रावर पुर्णवेळ हजर राहतील तसेच मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात नमूना अर्ज 6 ब भरुन मतदान ओळखपत्राशी आधार जोडणी करता येईल किंवा NVSP, VHP या पोर्टलचा देखील वापर करून ऑनलाईन आधार जोडणी मतदारास करता येणार आहे.
तरी जळगांव जिल्हयातील सर्व मतदारांनी दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्यावा, व आपले मतदान ओळखपत्र आधार क्रमांकांशी जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे वतीने व उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.