<
जळगाव: 30 ऑक्टोबर-(प्रतिनिधी) – जळगाव मध्य रेल्वे जंक्शन स्थानक परिसरात दिनांक 30 रोजी सकाळी जळगाव प्लॉगर ग्रूपतर्फे स्वच्छता अभियान 33 राबविण्यात आले.
जळगाव जंक्शन स्थानकावर तसेच स्थानक परिसरात प्लॉगर ग्रूपतर्फे रविवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात येऊन स्वच्छता जनजागृती व तसेच या मोहिमे अंतर्गत रेल्वे स्थानक परिसर व फलाट क्रमांक 1 ते 6, लोहमार्ग दरम्यान प्रवाशांकडून फेकण्यात येणारे पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, फूड पॅकेटस, रॅपर्स, दारू बॉटल, ओला कचरा व सुका कचरा याचे संकलन करून नवा व जुना पादचारी पूल, मालगोदामासह मध्यरेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या कामाची दखल सेंट्रल रेल्वे यांनी घेतली असून त्यांनी देखील जळगाव प्लॉगर युवा टीम अशी पहिली टीम आहे की त्यांनी रेल्वे परिसर स्वच्छ केला आहे . जळगाव प्लॉगर युवा टीम यांचे कौतुक व प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली !
प्लॉगर टीम ने आतापर्यंत दर रविवारी सकाळी सार्वजनिक ठिकाणी जाऊन (३२ ठिकाणी असे स्वच्छता अभियान राबविले आहे)
कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासून करावी. म्हणून प्लॉगर टीमने या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला आहे. आणि यापुढेही तो असाच चालत राहील.
स्वच्छ भारत समृद्ध भारत
जळगाव प्लॉगर टीम अध्यक्ष चेतना जैन, प्रयाग पाटील, राहुल सुराणा व ३० सदस्यांसह रेल्वे स्थानक व्यवस्थापक एस. बी. सनस, आरोग्य निरीक्षक मनीष शर्मा, जळगाव रेल्वे स्थानक पोलीस अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.