<
बोदवड – (प्रतिनिधी) – आत्मसन्मान फाउंडेशन कडून जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये महिला मनोरुग्ण निवासी पुनर्वसन प्रकल्प चे लोकार्पण करण्यात आले …बेघर ,अनाथ रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आश्रय व उपचार देऊन पुन्हा जीवन प्रवाहात आणणे , सोबतच कुटुंब आश्रित गरिब व गरजू मनोरुग्णांना औषध उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे असे या संस्थेचे कार्य सुरू आहे… मनोरुग्ण पुनर्वसन प्रकल्प सुरू असताना तेथे आतापर्यंत केवळ पुरुष मनोरुग्ण यांच्यासाठीच पुनर्वसनाची व्यवस्था होती , परंतु आत्मसन्मानकडून महिलांसाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . या सुविधेचे उद्घाटक म्हणून श्री तिरुपती बालाजी संस्थांन चे सचिव श्री लक्ष्मीनारायणा उरमी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री श्यामकांत काळवीट सेवानिवृत्त मुख्याध्यापक नांदुरा, तसेच मुख्य अतिथी म्हणून औरंगाबादचे प्रसिद्ध उद्योजक श्री एन जे पाटील , बोदवडचे नगराध्यक्ष श्री आनंद भाऊ पाटील , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अजय बरडिया, नाशिक वरून सामाजिक कार्यकर्त्या सौ यमुताई अवकाळे, बुलढाणा येथून डॉ शैलेश छाजेड , श्री तुळशीराम मापारी (मोताळा) , श्री प्रभाकर साळुंखे ( जळगाव) , लीलाताई चौधरी , सुलभा दीदी (नांदुरा), श्री अजय वेरूळकर, श्री भागवत आढाव, मुंबई ओंकार यन्नम, अहमदनगर इ मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक चौधरी यांनी तर प्रास्ताविक प्रिन्सिपल विश्वास मापारी , आभार प्रदर्शन श्री समाधान पाटील यांनी केले . आत्मसन्मानचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ पत्रकार श्री महेंद्र पाटील यांनी आपली भूमिका मांडली , कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टीम आत्मसन्मान परिश्रम घेण्यात आले . बोदवड परिसरात महिला मनोरुग्णांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झाल्याचे येथील लोकांकडून कौतुक स्वागत करण्यात येत आहे.