<
जळगाव दि.17- “खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व जळगाव क्रीडा विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सूर्यनमस्कार व आसन घेऊन घेण्यात आल्या.
स्पर्धेचे उद्घाटन सोहम योग केंद्राचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जळगाव क्रीडा विभाग समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ. पी आर चौधरी, डॉ. प्रतिभा ढाके, आय एम आर च्या डॉ. ममता दहाड , एम आर वायकोळे हे उपस्थित होते.
संचालक प्रा. डॉ. शिल्पा किरण बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक प्रा नीलिमा पाटील, प्रा संदीप घोडके, डॉ. रोहिणी बोडस यांनी यशस्वीपणे पार पडल्या तसेच आय एम आर च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
स्पर्धेत पुरुषांचे सहा व महिलांचे सहा संघ सहभागी झाले होते. पुरुष गटात प्रथम क्रमांक मु. जे. महाविद्यालय जळगाव, द्वितीय क्रमांक श्रीमती जीजी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व तृतीय क्रमांक के सी ई आय एम आर यांनी मिळवला. तसेच महिला गटात प्रथम क्रमांक मु. जे. महाविद्यालय जळगाव, द्वितीय क्रमांक श्रीमती जीजी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व तृतीय क्रमांक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाने पटकाविला.
विजेत्या प्रथम द्वितीय व तृतीय महिला व पुरुष संघांना आय एम आर तर्फे ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
तसेच उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या सहा पुरुष व सहा महिला स्पर्धकांना मेडल्स देऊन गौरविण्यात आले.
योगा स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून पंकज खासबागे हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.ज्योति वाघ, प्रा सोनल महाजन, प्राध्यापक जास्मिन गाजरे , श्रद्धा व्यास, ॲड. प्रकाश राठोड व टाईम मॅन म्हणून दिनेश राठोड व गौरव जोशी यांनी काम पाहिले.