<
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित झांबरे माध्यमिक विद्यालय आणि सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय निवासी गाईडच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात सकाळी सहा वाजता योगाभ्यासाने करण्यात आली त्यानंतर प्राणायाम आसने घेण्यात आली. शिबिराचे उद्घाटन लेडी बेडेन पाॅवेल आणि ओंकाराच्या प्रतिमेचे पूजन करून सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अॅंड नॅचरोपॅथी सेंटर प्रमुख डॉक्टर देवानंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात विद्यार्थिनींना वयात येतांना कोणकोणती काळजी घ्यायची आरोग्य कसे व्यवस्थित ठेवायचे याविषयी डॉक्टर शितल विसपुते यांनी मार्गदर्शन केले.तर प्राध्यापिका सोनल महाजन यांनी गुड टच बॅड टच याविषयी मुलींना सोदाहरण स्पष्टीकरण केले.
शिबिरात गाईडच्या प्रार्थना विविध प्रकारची गाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी मुलींना शिकवण्यात आल्या.तसेच शेकोटीच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केले. दुसऱ्या दिवशी सकाळी समारोपाच्या कार्यक्रमात वैभवी बडगुजर ,धनश्री रोकडे ,हेताक्षिबारी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन शिबिराची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अॅंड नॅचरोपेथी सेंटरच्या प्रा. सोनल महाजन,प्रा. अनंत महाजन, माधवी तायडे, कृष्णाली पाटील, विकास खैरनार यांनी केले पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे यांनी मार्गदर्शन केले
संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माधुरी भंगाळे, प्रतिभा लोहार, पुनम कोल्हे, वर्षा राणे, रोहिणी पाटील, डी ए पाटील, नेमिचंद डी झोपे, ल यांनी सहकार्य केले.