<
भडगाव(प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा. कि.शि.संस्था, भडगाव, संचलीत गो.पु.पाटील, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, न्यू.इंग्लिश मेडियम स्कूल,कला महाविद्यालय कोळगाव (भडगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक-२३ सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत आयोजित कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताहाची सुरुवात उद्घाटन समारंभाने मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून चिंधा पाटील,युवराज पाटील,संजय पाटील,संभाजी पाटील,नरेश पाटील,राजु महाजन आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उद्घाटनपर रस्सीखेच सामना प्रमुख पाहुणे व आयोजकांमध्ये खेळविण्यात आला.
आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात न्यू इंग्लिश मेडियम स्कूल, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध, पाककला, वादविवाद, रस्सी खेच, डोळ्याला पट्टी बांधणे, वाटीत चमच्याने चेंडू टाकणे,जिलेबी तोडणे, १००-२०० मी.धावणे, मुलींचा क्रिकेट सामना, स्लो सायकलींग, गोणपाट, तिपाई, फुगे फुगवणे, स्पंज बकेट, मटका फोडणे, वक्तृत्व, संगीत खुर्ची, चालता-बोलता इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.माळी, न्यू.इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य संदीप देसले, पर्यवेक्षक टी. एस.पाटील, माया मराठे, अनिल पवार, आर.एस. पाटील, किशोर चौधरी, मनोज पवार आदि उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहातील विविध स्पर्धेसाठी तसेच कार्यक्रमांसाठी प्राचार्य आर.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर प्रशांत पाटील यांनी आभार मानले.