<
जळगाव – (प्रतिनिधी) – भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र जळगाव व्दारा 2021-22 या वर्षासाठी विकासात्मक कार्यात उल्लेखनिय कार्य करणा-या युवा/महिला मंडळास जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मण्डल पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरुप रुपये 25000/-(रुपये पंचवीस हजार फक्त) व प्रमाणपत्र असे आहे. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्काराकरीता पात्र राहील. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप प्रथम रु. 75000/-, व्दितीय 50000/- व तृतीय रुपये 25000/- असे आहे. राज्य स्तरावर निवड झालेल्या मंडळाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकरीता शासनास पाठविण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कारा निवडण्यात येतील त्यात प्रथम पुरस्कार रुपये 300000/-(रुपये तीन लक्ष) व्दितीय पुरस्कार रु.100000/-(रुपये एक लक्ष) आणि तृतीय पुरस्कार रुपये 50000/- (रुपये पन्नास हजार) व प्रमाणपत्र असे आहे. तरी जिल्हयातील इच्छुक युवा मंडळ, महिला मंडळ विहित नमुन्यातील अर्ज दि. 20/12/2022 पर्यंत नेहरु युवा केंद्र जळगाव कार्यालयात सादर करावे असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी नेहरु युवा केंद्र जळगाव प्लॅाट नं. 60, मानराज पार्क, जळगाव, दुरध्वनी क्र. 0257-2951754, email [email protected] येथे सपर्क साधावा. अर्जाचा नमुना विनामुल्य नेहरु युवा केंद्र कार्यालयातून मिळेल.