<
आ र ओ फिल्टर योजना बसण्याची मागणी -प्रदीप साळी
जळगांव(धर्मेश पालवे):- जिल्ह्यात एकीकडे निवडणुक येत असल्याचे पाहून विविध राजकीय पक्षांनी नित्य पाणी उपलबद्ध करू व शुद्धतेवर भर देऊ असा विश्वास दिला आहे, तर स्थानिक राजकीय नेत्यांनी शासनाची योजनांची हमी देऊन मत अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र येथील नशिराबाद मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या व राजकीय सूत्र हलवणाऱ्या शहरालगत च्या गावात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याची बातमी आहे. वार्ड क्रमांक ४ भवानी नगर भागात मध्ये सर्व कष्टकरी व मजूर असणारे लोकं राहतात,मोठया संख्येने येथे नागरिकांना दूषित पाण्या मुळे विविध आजारांना बळी पडावं लागत आहे. पोटाचे विकार, मुतखडा, पित्ताशयवर गाठी, उलट्या, जुलाब,व डेंग्यू सारख्या आजारावर आज पर्यंत बहुतेक लोकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.आणि लाखो रुपयांचा आर ओ वाटर फिल्टर योजना बसवण्यासाठी घेतलेलं अनुदान ही योग्य वेळी बांधून वापरण्या साठी खुले करायची गरज असूनही त्या बाबत ग्रामपंचयत दुर्लक्ष करत असून टोलवाटोलवी करत आहे.म्हणून येथील ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी यांनी ग्रामपंचायत वारंवार कळवले आहे मात्र उपयोग झाला नाही, व गावातील उपकेंद्रात तपासनिसच व कर्मचारी डॉक्टर दुपारी १२ वाजे नंतर हजर राहत नसून लोकांना या उपकेंद्राचा उपयोग नाही . गावातील नागरिकांच्या सह्या घेऊन प्रदीप साळी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सीईओ व गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार अर्जात आपले म्हणणे मांडले आहे.तदनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशी आमच्या लेव्हल वर करू असे सांगून आदेश संबंधित लोकांना दिले असे सांगितले. तर उर्वरित अधिकारी लोकांशी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही