<
विशेष प्रतिनिधी- सर्वोदय माध्यमिक विद्यालय उंबरखेड संचलित कुंझर येथील विद्यालयात इयत्ता 5 वित शिकत असताना इयत्ता पाचवी ते दहावी सतत झालेल्या आंतरशाखीय वकृत्व स्पर्धेत हिंदी विषयात प्रथम क्रमांकाने बक्षीस पटकावणारे पाचवीत असतानाच या संस्थेच्या बारा-पंधरा विद्यालयाच्या शाखांमधून घेण्यात येणाऱ्या आंतरशाखीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर देत असलेल्या बातमीत माझ्या नावापुढे माझ्या गावाचे नाव लावा असे आवर्जून सांगणा रा चमकदार चुणचुणीत प्रतिभासंपन्न चेहरा किशोर पाटील कुंझर कर यांनी त्यावेळी आपल्या सर्व शिक्षकांचे व गावाचे लक्ष वेधून घेतले होते मोठा झाल्यावर हा मुलगा नक्की काहीतरी उच्च पदावर जाईल असं सर्व गावाला वाटत होते परंतु स्पर्धा परीक्षा बीएससी ऍग्री इकडे नंबर लागू न सुध्दा वडील शिक्षक होते म्हणून आपण या पेशातच सेवाभावी वृत्तीने काम करण्याचा संकल्प करणारे स्पर्धा परीक्षांकडे तिकडे न वळता शिक्षकी पेशाकडे वळलेला हा चेहरा आपल्या शैक्षणिक सामाजिक भरीव कार्यातून जिल्हा परिषद जळगाव व महाराष्ट्र राज्य शासना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार एकाच वर्षी 2016 17 मानकरी ठरणारे जळगाव जिल्ह्यातील एकमेव असे नाव म्हणून पुढे आला आणि गावाची छाती अभिमानाने फुलून आली विद्यार्थीदशेत असल्यापासून प्रत्येक देशात प्रत्येक चांगल्या बाबतीत जेव्हा जेव्हा माध्यमांमध्ये नाव यायचे तेव्हा मिळालेल्या प्रत्येक यशाच्या वेळी आपल्या नावापुढे गावाचे नाव लावणारे बालपणापासूनच जीवन जगताना जात पात धर्म पक्ष कधीही न मानणारे केवळ माणुसकीवर श्रद्धा ठेवून माणुसकी व माणूस म्हणून सर्वांची मदत सेवा करणे हाच स्थायीभाव जोपासणारे किशोर रमेश पाटील म्हणजेच सर्वांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व किशोर पाटील कुं झ र कर यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून गावाविषयी चे ग्रामीण भागाविषयी विषयीचे प्रेम कृतीतून अधोरेखित करून ग्रामीण भाग व जन्मभूमी विषयी व मातीविषयी ओलावा जिव्हाळा निर्माण करून आपली प्रेरणादायी आदर्श भरला आहे व वाटचाल पुढे सुरू ठेव लि आहे
कुं झ र तालुका चाळीसगाव येथील आदर्श शिक्षक स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादू पाटील यांच्या सु संस्कारातून लहानपणापासूनच शैक्षणिक सामाजिक कार्याचा वसा घेतलेले व आजवर केलेल्या शैक्षणिक सामाजिक भरीव व सातत्यपूर्ण अखंड कार्यामुळे राज्य व जिल्हा स्तरावर वेगळी आदर्श ओळख निर्माण केलेले महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझर कर यांनी आपल्या आदर्शवत सेवाभावी वृत्तीतून प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा या चतुसूत्री च्या जोरावर कुं झ र गावाचे नाव जिल्ल्हयाच्याच नव्हे तर राज्याच्या नकाशावर सकारात्मकरीत्या उमटवण्या त आपल्या अष्टपैलू नेतृत्व आणि शिक्षण पत्रकारिता साहित्य राजकीय क्षेत्रातील कृतीयुक्त योगदानातून यश मिळविले आहे सातत्याने सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे वाटचाल केलेली आहे स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादू पाटील यांचा त्यांच्यावर बालपणापासूनच प्रभाव होता तात्यासाहेब आणि त्यांच्या पत्नी मातोश्री प्रभावती रमेश पाटील यांच्या सुसंस्कारित तयार झालेले किशोर दादा यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी मिळूनही बीएससी ऍग्री ला नंबर लागू लागूनही डीएड ला प्रवेश करून सेवाभावी वृत्तीचा शिक्षकी पेशा स्वीकारला गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे त्यांनी शोषित वंचित अनाथ उपेक्षित घटकांना विकासाच्या व शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून राज्यभर मोठी चळवळ उभारण्यात यश मिळविले आहे गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा भौगोलिक राजकीय अभ्यास सुरू करून त्यांनी तरुण शिक्षक व समाजातील विविध क्षेत्रातील सर्व घटकांचा मोठा गोतावळा निर्माण केला सर्व क्षेत्रातील गरजूंना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत करणे हा त्यांचा स्वभाव सर्वांना भावत आहे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी उत्तर कार्याच्या खर्च मध्ये भर घालून स्वखर्चाने कुं झ र तालुका चाळीसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला व महादेव मंदिराला व गावाला दिमाखात शोभा आणेल असे लाखो रुपये खर्च करून स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादू पाटील स्मृती प्रवेशद्वार बांधून दिलेले आहे त्या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण प्रसंगी गावातील सर्व नागरिक व तत्कालीन खासदार तसेच आजी माजी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते मंदिर व शाळा विद्यालय व देवालयाला शोभा आणणारे हे स्वर्गीय तात्यासाहेबांचे स्मृती प्रवेशद्वार आजही सर्व गावाला प्रेरणादायी आहे एवढ्यावरच न थांबता आपण आपण स्वतः कार्यरत एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळई येथे त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांना दाखल करून ज्यावेळी राज्यात कुठेच सेमी इंग्रजी माध्यम जिल्हा परिषद शाळेत नव्हते त्यावेळी त्यांनी सण 201 0 साली स्वच्छेने सेमी इंग्रजी माध्यमाची जी प शाळेत सुरुवात केली त्यांचा हा पॅटर्न जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले त्यांनी राबवलेल्या उपक्रमावर स्वतः कृती संशोधन केले त्यांनी केलेले कृती संशोधन राज्य शासनाचे स्तरावर स्वीकारले गेले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादात त्यांची निवड झाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची गरज व उपयुक्तता सिद्ध होत आहे हे किशोर पाटील कुंझर कर यांच्या द्रष्टेपण व कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे शिक्षणाच्या कामातून समाधान न मानता फावल्या वेळेत कुणाच्याही वाढदिवसाला लोकराज्य मासिक भेट देण्याचा त्यांचा उपक्रम राज्यभर अभिनंदनीय आणि कौतुकाचा ठरला आहे जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर विलास बोडके यांनी या विषयासंदर्भात त्यांचे विशेष अभिनंदन केले याकामी त्यांना राज्याचे जलसंधारण तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन व जीएम फाऊंडेशनचे सातत्याने सहकार्य लाभत आहे आतापर्यंत त्यांनी शासनाच्या 2000 लोकराज्य मासिकांचे वितरण ग्रामीण व शहरी भागात केले आहे दरवर्षी रक्तदान करणे अवयव दान करणे बेटी बचाव बेटी पढाव ही चळवळ मुक्तपणे पुढे नेण्यासाठी ग्रामीण भागात सण उत्सवाच्या वेळेस बैलपोळ्याला बैलांवर बेटी बचाव बेटी पढाव शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका असा संदेश लेखनाचा व जनजागृतीचा नाविन्यपूर्ण असा त्यांचा मागील 18 वर्षापासून चा प्रपंच उपक्रम आता राज्यात चळवळीच्या स्वरूपात पुढे आलेला आहे राज्याचे शिक्षक केंद्रप्रमुख वस्तीशाळा शिक्षक पदवीधर शिक्षक सर्वांचे प्रश्न मंत्रालय पातळीवर प्रामाणिक व पोटतिडकीने मांडण्यासाठी हे सतत पुढाकार घेणारे राज्यातील शिक्षक संघटनेचे मुलुख मैदान तोफ व अभ्यासू पदाधिकारी ठरत आहेत शिक्षक सामाजिक बांधिलकी जोपासणारा असावा लोकाभिमुख असावा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना पुढे नेणारा असावा हा त्यांचा जीवनातील निस्वार्थ व निकोप दृष्टीकोन आहे हे वारंवार पहावयास मिळते हे त्यांची जमेची बाजू सर्वांनाच प्रभावित करणारी आहे आदर्श शिक्षक स्वर्गीय तात्यासाहेब रमेश स हा दु पाटील यांचा त्यांच्यावर झालेला संस्कार त्यांना गरीब गरजू ग्रामीण-शहरी भागातील शोषित शैक्षणिक सामाजिक आर्थिक स्तरातील वंचितांना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे जलसंवर्धन दुष्काळ मुक्ती व्हावी म्हणून त्यांनी सातत्याने स्वतःच्या गावात संपूर्ण टीम सह श्रमदान करून जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे त्यासाठी पाणी फाउंडेशन जलमित्र मित्रांची कामाला स्वतः पाच हजार एक रुपये देणगी देऊन त्यांनी कुं झ र विकास मंचच्या सदस्यांसह श्रमदान करून सहभाग घेऊन मदत केली गावाच्या विकासासाठी कुंझर विकास मंच स्थापना त्यांनी केली असून त्यांच्या वकृत्व कर्तुत्वाने तसेच प्रामाणिकपणा सचोटी व प्रचंड धडपडीने भारावून राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग राज्य समन्वय समिती संघटनेच्या राज्य समन्वयक पदी राज्य मेळाव्यात त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी नव्हे तर खानदेश साठी भूषणावह आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर स्वतःच्या गावाने वाजत गाजत डीजे च्या जयघोषात घोड्यावरून या लोक शिक्षकाची मिरवणूक काढणे म्हणजे देशातील सर्व शिक्षकांचा गुरूंचा गौरव होता घोड्यावरुन गावाने मिरवणूक काढून कुं झ र भूषण सन्मानाने या उमद्या नेतृत्वाचा गौरव केला त्यावेळी तत्कालीन आमदार व खासदार उन्मेश दादा पाटील तत्कालीन खासदार ए टी नाना पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे तहसीलदार शरद पवार प्रांतच पंचायत समितीच्या सभापती स्मितल ताई बोरसे संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंके गावातील सर्व आजी माजी सरपंच गावातील सर्व समाजांचे प्रतिष्ठित नागरिक युवक जवळपास सर्व गाव उपस्थित होता एकेकाळी संवेदनशील असलेला कुं झ र आता नवीन स्वरूपात तालुक्यात पुढे येऊ लागली आहे यासाठी नवीन युवकांची नवीन दिशा महत्त्वपूर्ण ठरत आहे किशोर पाटील कुंझर कर यांची महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ राज्य अध्यक्ष म्हणून देखील निवड होणे तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी येणे त्याच जोडीने आरोग्याच्या क्षेत्रात कोणी आजारी असलं म्हणजे त्याच्या उपचारासाठी त्यांनी पुढाकार घेणे यामुळे जिल्हाभरात आरोग्य दूत म्हणून देखील पुढे येत आहेत राजकारण हे आपले क्षेत्र नसून सामाजिक शैक्षणिक संघटनात्मक जीवनात निकोप तटस्थपणे सेवाभावी वृत्ती जोपासणे हाच आपला पिंड व छंद असल्याचे ते आवर्जून सांगतात याकामी समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकातील सज्जनशक्ती सदैव मदत करते याचा त्यांच्या बोलण्यातून सदैव सार्थ अभिमान प्रकट होताना दिसतो पत्रकार संघटनेच्या राज्य अधिवेशनात देखील निमंत्रित असताना पत्रकार संरक्षण कायदा मंजूर व्हावा पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी आपल्या मनोगतातून आग्रही भूमिका मांडली व राज्यातील सर्व पत्रकारांचे मन जिंकून घेतले शिक्षक पत्रकार ग्रामीण शेतकरी यांच्या प्रश्नांवर सामाजिक प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणाविरोधी कायदा समता व्यसन मुक्ती आदी बाबतीत देखील त्यांनी विविध शिबिर उपक्रम राबवुन पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती मराठा सेवा संघ येथे एरंडोल तालुका अध्यक्ष असून जिल्हा व तालुका पदाधिकारी आहेतअनुलोम या सेवाभावी संस्थेत ते जनसेवक आहेत तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची पुस्तिका त्यांनी ग्रामीण भागात पोहोचण्यात यश मिळविले आहे थोर समाजसेवक अण्णा हजारे त्यांनी राळेगणसिद्धी येथे त्यांचा गौरव केला आहे तर हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांच्या माध्यमातून अनेक उपक्रमांतून त्यांनी जलसमृद्धी चळवळ पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे हिवरेबाजार व राळेगणसिद्धी दोन्ही ठिकाणी आठ दिवस थांबून त्यांनी संपूर्ण अभ्यास करून ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन करण्याचा वसा घेतला आहे राज्य शासनाच्या टाटा ट्रस्ट ब्रिटीश कौन्सिल व शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या करारानुसार राज्यात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना इंग्रजीची आवड निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पात घेण्यात आलेल्या ऑनलाईन इंटरव्यू मध्ये त्यांची निवड होऊन इंग्रजी विषय शिकविण्यासाठी तेजस टॅग कॉर्डिनेटर म्हणून ते उत्तम पणे भूमिका बजावत आहे इंग्रजी जपान मराठी उर्दू हिंदी आदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातूनपत्रकारिता मास कम्युनिकेशनची पद्युत्तर पदवी एम ए जनसंवाद त्यांचे पूर्ण झाले आहे देशासह राज्यातील जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा जवळचा संबंध असून एक शासन व समाज यांना जोडणारा समाजदूत म्हणून त्यांची ओळखसर्वत्र निर्माण झालेली आहे कुठल्याही पक्षाशी थेट संपर्क नसलेले परंतु आरोग्यदूत राज्याचे संकटमोचक नामदार गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्य व्यक्तिमत्व व कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या गोतावळ्यातील एक विश्वासू घटक बनल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आलेले आहे परंतु असे करत असताना ते माध्यमिक संस्थेत नोकरीला नाहीत किंवा महाविद्यालयात नोकरीला नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यामुळे त्यांना त्यांची नोकरी सोडावी लागेल आणि ते ही कृती करतात का हे बघ ने देखील महत्त्वाचे ठरणार आहे एकंदरीत त्यांचा स्वभाव पाहता ते राजकारणापासून कायम चार हात लांब राहतात केवळ सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात सेवाभावीवृत्तीने समर्पित भावनेने काम करणे हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आतापर्यंत सर्वांना दिसून आलेले आहे सन 2000 ते 2010 या कालखंडात जालना जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत असताना येथील खासदार व आताचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तत्कालीन पालकमंत्री राजेश भैय्या टोपे आदींच्या हस्ते त्यांना आदर्श युवा शिक्षक पुरस्कार संस्थेमार्फत सन्मानित करून गौरवण्यात आले आहे मराठवाड्यातील कुठल्याही तालुक्यात गेले म्हणजे त्यांनी सामाजिक पत्रकारिता शिक्षण क्षेत्रात उभी केलेली फळी आजही आपले लक्ष वेधून घेते सातत्याने या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनात कार्य करीत असताना त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी विचारले असता त्यांनी स्मितहास्य करून कार्यमग्नता हेच आपले जीवन असून निस्वार्थ सेवाभाव आपल्याला सर्वत्र कामी येतो असे म्हटले.