<
जळगाव(प्रतिनीधी)- येथील शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात आजी आजोबा नात नातु यांच्यातील ‘संवाद’ याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक दलित डाॅ. व्ही.आर पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की आजी आजोबा नात नातु यांच्यातील ‘संवाद’ वाढणे गरजेचे आहे. संवादाने प्रेम वाढतो, दुःख दूर होते. सुसंगती ने माणसाची प्रगती होते तर कुसंगती माणसाची प्रगती थांबते म्हणून सुसंगती सदा घडो. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक एल.पी चौधरी यांनी केले तर आभार हरित सेनेचे शिक्षक एस.पी.नेहते यांनी मानले.दरम्यान व्ही.आर पाटील याच्या तर्फे गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ए.ए सुरवळकर, हर्षा चौधरी, प्रतिभा चौधरी, खगेश्वरी पाटील केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता छात्रअध्यापक असलम मन्यार, मिलिंद महाजन, देवानंद धुंदाळे, दिव्या मकवाने, कांतीलाल पाडवी, सरिता नाईक, शांता पाडवी, किरण चौधरी, कोमल चौधरी, सोनाली देवकर, लक्ष्मी कवळे, रूबिना तडवी आदींसह मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.