<
जळगांव(प्रतिनीधी)- आज पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात अरुण शेवते लिखित व श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ रेखा महाजन, डॉ रवी महाजन, अमरभाई कुकरेजा, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ. शिल्पा बेंडाळे लाभले.सामान्य माणसाला पडणारे प्रश्न सामान्य मांसाठी निर्माण झालेली सरकार नावाची संस्था लोक कल्याणकरी राज्य ही आपल्या घटनेने स्वीकारलेली व्यवस्था असताना देखील लोकांचे कल्याण करण्यास सरकार यशस्वी आहे का? छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणसाची होणारी ससेहोलपट मग ते रस्तावरचे खड्डे असतील. पाण्याच्या प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न, साफसफाईचा प्रश्न असेल या प्राथमिक प्रश्नांतच गुंतून पडलेला सामान्य माणूस किंवा आत्महत्येच्या काठावर असलेला शेतकरी, संपूर्ण दुर्लक्षित असेलला आदिवासी, आणि दलित या सगळ्यांना दाद कोणाकडे मागायची हे कळत नाही म्हणून थेट पंतप्रधानांना पत्र. श्रीनिवास नार्वेकर व अमृता मोडक या जोडीने सहज असे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकलीत.
नेपथ्य-प्रकाश सुनील देवळेकर, ध्वनी संयोजन अभिलेष सरपडवळ यांनी केले.भर पावसात देखील दर्दी प्रेक्षकांनी गर्दी केली. लोक आता रोजच्या चर्चेत सामील होत आहेत. महोत्सवाविषयी बोलत आहेत, परिवर्तनने नवा मापदंड प्रस्थापीत केला आहे.उद्या गुरुवारी “अभिवाचन महोत्सवाने वाचन संस्कृती रुजवण्यास पूरक आहे का ? ” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून डॉ प्रदिप जोशी, कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर, श. दि. वडोदकर, गनी मेमन, रफिक काझी सहभागी होणार आहेत.