Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारावेत!

Desk Team by Desk Team
25/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच स्पष्ट मत

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) – देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत. पत्रकारांनी रोखठोक, निर्भीड भूमिका घेणे ही नितांत गरज बनली आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना कोंडीत आणणारे प्रश्न विचारण्यापासून मीडियाला रोखले जाते, तेव्हा ती लोकशाहीच्या अस्तित्वाशी केलेली तडजोड ठरते, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रसारमाध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच लोकशाहीत सरकारला बेधडक, निर्भीड प्रश्न विचारले जातील, अशा पत्रकारितेला आपण प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. पत्रकारांना निर्भीड पत्रकारिता करण्यापासून रोखल्यास त्याचा थेट लोकशाहीच्या अस्तित्वावर परिणाम होतो, असे मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि रामनाथ गोयंका फाऊंडेशनने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते, जर कुठल्याही देशात लोकशाही सुदृढ जपायची असेल,तर त्या देशात प्रसारमाध्यमे रोखठोक असली पाहिजेत. स्वतंत्र राहिली पाहिजेत, असेही त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड हे प्रमुख यावेळी नमूद केले.

जबाबदार पत्रकारिता जणू सत्याचा दीपस्तंभ सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक न्यायनिवाड्यांमध्ये प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर भर दिला आहे. जोपर्यंत हिंदुस्थानचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे, तोपर्यंत पत्रकार कुठल्याही सुडाच्या भीतीशिवाय सरकारसमोर सत्य बोलू शकतात, याचा आम्हाला विश्वास आहे. जबाबदार पत्रकारिता ही सत्याच्या दीपस्तंभासारखी असते. ही पत्रकारिता आपल्याला उज्ज्वल उद्याचा मार्ग दाखवू शकते, असे सरन्यायाधीश म्हणाले. यावेळी त्यांनी मीडिया ट्रायलवर चिंता व्यक्त केली.

Desk Team

Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम

Next Post

पाच हजाराची लाच घेताना तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

पाच हजाराची लाच घेताना तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo