<
जळगाव-( प्रतिनिधी)- मानवी जीवनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. या अमूल्य पाण्याचा प्रत्येकाने अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केंद्रीय विद्यालय बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी जैन इरिगेशनच्या जल संरक्षण अभियानाच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डाॅ. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून अत्यंत रंजकपणे पाण्याचे महत्व पटवून दिले. या उद्घाटन समारोहास आनंद पाटील, किशोर कुळकर्णी, केंद्रीय विद्यालयाच्या ज्योती कामत हे उपस्थीत होते. केंद्रीय विद्यालयातील एआरसी हाॅलमध्ये जल संरक्षण अभियानाचे औपचारीक उद्घाटन झाले. आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जल संरक्षणाबाबत तयार केलेल्या उद्बोधक पोर्स्टसचे प्रदर्शन विद्यालयाच्या लायब्ररीत मांडण्यात आले. 26 व 27 असे दोन दिवस हे अभियान असेल. वरिष्ठ शिक्षिका ज्योती कामत यांनी सूत्रसंचालन व डाॅ. सुब्रह्मण्यम यांचा परिचय करुन दिला. शेवटी विद्यार्थ्यांना जल बचतीची शपथ देण्यात आली. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल विद्या हिवराळे, रवींद्र चव्हाण, मिनाक्षी आर. पाटील, मिनाक्षी एम. पाटील यांनी सहकार्य केले. कु. अनुश्री सोनवणे हिने आभार मानले.