
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर मौजे. शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे दि. 23 मार्च ते 29 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. आज शिबिराचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी डॉ. उमेश गोगाडीया राज्यशास्त्र विभाग प्रमुख सामाजिकशास्त्रे प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि. जळगांव, डॉ. दिपक सोनवणे सहा. प्रा. समाजकार्य विभाग, सामाजिकशास्त्रे प्रशाळा क.ब.चौ. उ.म.वि. जळगांव, तसेच वैभव कुशारे व मयूर अलकरी कार्यक्रम अधिकारी, खान्देश सकाळ इन, माध्यम समूह, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज आर. इंगोले व सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. कविता पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. उमेश गोगडीया यांनी भूषविले. यावेळी डॉ. मनोज इंगोले यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सात दिवसांत शिबिरा दरम्यान राबविलेले विविध उपक्रम, बौद्धिक वर्ग, स्वच्छता, श्रमदान, महिला आरोग्य तपासणी शिबिर, पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर केलेली जनजागृती, “जलसंधारणातून शास्वत विकासाकडे” या संकल्पनेतून विद्यार्थांनी उभारलेला “वनराई बंधारा” या सर्व उपक्रमाचा थोडक्यात उजाळा करून दिला. तसेच वैभव कुशारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. दिपक सोनवणे यांनी कवितेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे फायदे ज्यापासून व्यक्तीमहत्व विकासा सोबतच समाज व राष्ट्राप्रती असलेली आपली जबाबदारी व त्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा ही रा.से.यो तून निर्माण होते, असे प्रतिपादन यावेळी केले. तसेच डॉ. उमेश गोगडीया यांनी अध्यक्षीय भाषण करताना रा.से.यो. च्या माध्यमातून एक चांगला व जबाबदार नागरिक घडतो. असे प्रतिपादन करत या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या व्यवहारीक जीवनात होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी योगेश माळी, पृथ्वीराज पाटील, दिशा ढगे, वर्षा सगणे या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विजय ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी बाविस्कर या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले.