<
एरंडोल(प्रतिनीधी)- स्वच्छता ही सेवा या अभियानाची सुरुवात एरंडोल तालुक्यात प्रभावीपणे सुरू झाली असून या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवून ११ सप्टेंबर २०१९ ते २ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आपले गाव व आपला संपूर्ण परिसर स्वच्छ करावा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक तसेच सर्व बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता ही सेवा लोकचळवळ बनवावी असे आव्हान एरंडोल तालुक्याचे तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी नुकतेच पंचायत समिती एरंडोलच्या सभागृहात आयोजित तालुक्यातील सर्व कर्मचारी बचत गट सरपंचांच्या मेळाव्यात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर पं.स. एरंडोल चे व्ही.बी.चव्हाण, गटविकास अधिकारी कार्यालय कक्ष अधिकारी अजित कुरकुटे, कार्यालय अधीक्षक पवार ,पं.स. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, कासोदा बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील, एरंडोल बीट शिक्षण विस्ताराधिकारी जे.डी.पाटील , यू.आर.मराठे, रवींद्र लाळगे सर्व केंद्रप्रमुख, तालुक्यातील सर्व व्यवस्थापन खाजगी व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक,तसेच आदर्श शिक्षक तथा शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, ग्रामसेवक संघटनेचे आर.के.पटाईत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी या तालुकास्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे एरंडोल बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी जे.डी.पाटील यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, तालुक्यातील सर्व शाळांनी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी.यावेळी सर्वांना मतदान जनजागृती मोहीम अंतर्गत तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शपथ दिली. सदरील कार्यशाळेला उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना तसेच बचत गटातील सर्व अध्यक्ष व व महिला भगिनी तसेच सर्व सन्माननीय सरपंच यांना आपल्या खास कुंझरकर शैलीत पूर्ण मनोगतात राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी हात उंच करायला लावून प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी करण्याचा संदर्भात उस्फूर्तपणे संकल्प शपथ दिली. तसेच देश महासत्ता होण्यासाठी सर्वांनी मूल्य शिक्षणाची कास धरून वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वच्छता ही सेवा पर्वात सर्वांनी सहभाग नोंदवून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन जनजागृती व प्लास्टिक कचरा वेचने या संदर्भात समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन लोक चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे म्हटले. कार्यशाळेतील सर्वसमावेशक सहभागाबद्दल तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी सर्वांच्या सहभागाचे मनापासून कौतुक केले.यावेळी अध्यक्षस्थानावरून पुढे बोलताना एरंडोल तालुक्याच्या तहसीलदार अर्चना खेतमाळीस म्हणाल्या की, तालुक्यात सर्वत्र या मोहिमेविषयी सकारात्मक वातावरण तयार करण्यात आले असून प्लास्टिक बंदी मोहीम तालुक्यात कठोरपणे राबवली जाणार असून जीग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा शंभर टक्के प्लास्टिक कचरा गोळा करेल व गाव शाळा परिसर स्वच्छ ठेवत त्यांना तालुकास्तरावर आकर्षक प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात येईल.
लोकसहभागातून सर्वांनी मोठ्या गोण्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून ठेवावा. प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोकण्याचा इशारा देखील दिला. तसेच यासाठी अधिकारी वर्गाला देखील गावे दत्तक देऊन शंभर टक्के मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन केले असल्याचे म्हटले सदरील तालुकास्तरीय व्यापक कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी पं.स.गटविकास अधिकारी कार्यालयाचे तसेच शिक्षण विभाग महसूल विभाग आरोग्य विभाग ग्रामसेवक विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.