<
तळोदा-(प्रतिनीधी) – शहरात मच्छर प्रतिबंधक व औषध फवारणी करण्याची मागणी शहरातील नागरिक आशिष बारी (सामाजिक कार्यकर्ता) यांनी नगरपालिकेच्या मुख्याध्याधिकारी श्रीमती सपना वसावा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तळोदा शहरात मागील दोन महिन्यापासुन पावसाचे दिवस सुरु आहे, तरी या पावसाच्या पाण्यामुळे संपुर्ण तळोदा शहरात ठिक-ठिकाणी पाणी साचत असुन त्यातून मच्छरांची उत्पत्ती होऊन नागरिकांमध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहे, तरी मच्छरांचे प्रमाण हे अधिक वाढल्याने शहरात डेंग्यू, मलेरिया, हिवताप व साथीचे आजार हे वाढण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही , तरी आपण आपल्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण तळोदा शहरात मच्छर प्रतिबंधक औषध फवारणी करावी व रोगराई मुक्त तळोदा शहर अभियान राबवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करणयात आली आहे. तळोदा शहरात औषध फवारणी करावी या मागणीचे निवेदन तळोदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांना देतांना शहरातील आशिष बारी, अजय परदेशी व गोलू बारी इ. उपस्थित होते.
Bahut khub aashish bhai ????