<
जळगांव (प्रतिनिधी) – जळगांव ग्रामिण मतदार संघातून लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील हे निवडणूक लढविणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले असल्याने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
आजपासून उमेदवारी नामांकन अर्ज विक्री सुरु झाली असून पहिल्याच दिवशी लकी अण्णा टेलर यांनी नामांकन अर्ज घेतला आहे. तर जळगांव ग्रामिण मतदार संघातील गोवोगावी जावून थेट मतदार संघातील मतदारांशी संपर्क साधत आहे. ठिकठिकाणी मेळावे घेवून मतदार संघ पिंजून काढत आहे. जळगांव ग्रामिण मतदार संघातील भाजपाची ताकद लकी अण्णा टेलर यांच्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे.
जळगांव ग्रामिण मतदार संघातून निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढविणार याबाबत लकी अण्णा टेलर यांना आमच्या “सत्यमेव जयते” च्या प्रतिनिधी ने विचारणा केली असता ते म्हणाले सेना-भाजपाची युती न झाल्यास भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढेल, युती झाल्यास मी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले असून जळगांव ग्रामिण मतदार संघातील ‘भाजपा’ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे लकी अण्णासाठी ‘ताकद’ लावत आहे. लकी अण्णा हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती असतांना कृउबाला नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाचा कारभार चालवतांना घेतलेले निर्णयामुळे ‘व्हीजन’ आणि पारदर्शक कारभाराची शैली जळगांव ग्रामिण मतदार संघातील अनेकांनी पाहीली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून लकी अण्णा टेलर यांनी जळगांव ग्रामिण मतदार संघात संपर्क वाढविला. गावोगावी जावून संधी दिल्यास भुलथापा मारणार्यां नेत्यांपासून सुटका करुन मतदार संघात एकही कच्चा रस्ता ठेवणार नसल्याचे आश्वासन देतांना दिसत आहे.
ना.गुलाबराव पाटील यांची देखील जळगांव ग्रामिण मतदार संघावर चांगली पकड आहेच मात्र युती असतांना भाजप या मतदार संघात युतीच्या उमेदवाराला मदत न करता लकी अण्णा यांना करत असेल तर ना.गुलाबराव पाटील यांच्या यांना लकी अण्णा टेलर नावाचे तगड्या आव्हानाला समोर जावे लागेल हे निश्चित.