Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे यांना शहरातील अयोध्या नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर भागात भरभरून प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
आ. राजूमामा भोळे यांना शहरातील अयोध्या नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर भागात भरभरून प्रतिसाद

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी शनिवारी दि. ९ रोजी सकाळी अयोध्या नगर परिसर, अशोक नगर, विद्यानगर, रामचंद्र नगर भागात नागरिकांशी संवाद साधून विजयासाठी शुभाशीर्वाद घेतले. एका वृद्ध महिलेने, “राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजो रे भौ…” म्हणत शुभाशीर्वाद दिले. या महिला भगिनीच्या प्रेमामुळे आ. राजूमामा भोळे भारावून गेले.

आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी अयोध्या नगर येथील मनुमाता मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून हॅपी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, महादेव मंदिर परिसर, अशोक नगर, गीताई नगर, साईबाबा मंदिर परिसर, सिद्धिविनायक विद्यालय परिसर मार्गे रामचंद्र नगरातील हनुमान नगरात प्रचाराचा समारोप केला. परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिरात महिला भगिनींनी, स्वागतम मामा…सुस्वागतम मामा… गीताने स्वागत करून औक्षण केले. भगवान श्री विश्वकर्माचे आ. भोळे यांनी दर्शन घेतले.

यानंतर विशाल कोल्हे, सुनील सरोदे, प्रदीप रोटे, विजय वानखेडे, शालिक चौधरी आदींच्या घरी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले. खा. स्मिता वाघ यांनी प्रचारात उपस्थिती देऊन महिला भगिनी व नागरिकांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी रिपाई व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, दीप्तीताई चिरमाडे, संतोष इंगळे, किसन मराठे, बंटी भारंबे, ललित भोळे, सचिन भोळे, प्रकाश पाटील, आकाश भोळे, प्रकाश चौधरी, प्रदीप रोटे, पी. टी. दुसाने, वासुदेव भंगाळे, ॲडव्होकेट दीपकराज खडके, सोहन खडके, कुणाल खडके, निळकंठ खडके, मंजुळा मराठे, सीमा वाणी, मंगला खडसे, मनीषा रोटे, भावना लोखंडे, योगेश डोळे, योगेश निंबाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण, कुंदन काळे, हर्षल मावळे, शंतनु नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, संजय सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांचा बी जे मार्केट मधील व्यापाऱ्यांसोबत संवाद

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरात १४ केंद्र;सर्व केंद्रावर असणार CCTV च्या माध्यमातून नजर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo