जळगाव –(प्रतिनिधी)- येथील जना स्मॉल फायनान्स बँक यांच्यातर्फे शासकीय १०० खाटांचे शासकीय रुग्णालय मोहाडी येथे सी. एस. आर. (सामजिक उत्तरदायित्व निधी) या माध्यमातून शुद्ध पाण्याचे वाटर फिल्टर चे वितरण करण्यात आले. सदर रुग्णालयामध्ये जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महिला व बालक हे मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी शुद्ध पाण्याच्या मशीनची गरज ओळखून बँके तर्फे सदर मशीन हे उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री फिरोज खान पठान, सह व्यवस्थापक सचिन बालापुरे , सिद्धार्थ जाधव बँक व्यवस्थापक निलेश सूर्यवंशी, मयूर गुरव, शरद विंचूरकर तसेच बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते व हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सोनवणे, डॉ. अतुल पाटील यांनी सदर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णालयातर्फे आभार मानले.