<
“योग्य व्यायाम व योगाव्दारे ह्रदय रोग टाळता येईल.”
जळगाव(प्रतिनिधी)- रोजच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनशैलीत आपण व्यायाम आणि योगाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. व्यायाम व योगासने यांचे फायदे माहीत असूनही या सवयी अंगी बाळगायला आपण टाळाटाळ करतो. जर आपण व्यायाम आणि योग यासाठी वेळ दिला तर अनेक आजारांपासून स्वत:चे संरक्षण करता येते.” असे डॉ.अमित जायस्वाल व डॉ. सोनल महाजन यांनी प्रतिपादन केले.माधवबाग कार्डिअँक क्लिनिक व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ह्रदय दिनानिमित्त आयोजित केलेल्या”स्वस्थ ह्रदयासाठी योग्य व्यायाम व योगासने”या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ह्रदयासंबंधित अनेक समस्यांशी संबंधित समज गैरसमज,आणि तथ्य याबाबत डॉ. जायस्वाल यांनी मार्गदर्शन केले. आहार, विहार व दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून त्याला व्यायाम व योगासनांची जोड दिल्यास ह्रदय रोग टाळता येतो. तथापि कोणताही व्यायाम किंवा योग तंत्रशुद्ध रित्या करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.उच्च रक्तदाब, धुम्रपान, तंबाखू, कोलेस्ट्रॉल, मधुमेह ई.बाबतीत डॉ. जायस्वाल यांनी शास्त्रशुध्दरित्या माहिती दिली.
डॉ. सोनल महाजन यांनी ताण तणावाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करून त्याला योगासनांची जोड दिली तर निरामय व निरोगी आयुष्य निश्चितच जगता येते.चुकीच्या पद्धतीने प्राणायाम आणि योगासने केली तर, न्युराँलाँजिकल किंवा ह्रदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेप्राणायाम व योगासने करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. महाजन यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकांव्दारे प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम व ह्रदयाशी निगडीत योगासने करून घेतलीत.त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धा विजेती कल्याणी चौधरी यांनी प्रात्यक्षिके सादर केली. माधवबाग कार्डिअँक क्लिनिक चे डॉ. श्रेयस महाजन व डॉ. श्रद्धा माळी यांनी उपस्थितांच्या शंकांचे वैद्यकीय द्रुष्ट्या समाधान केले.कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्लिनिक चे पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह पूजा पाटील, कम्युनिस्ट हेल्थ एक्झिक्युटिव्ह राजेश कसरकर,पंचकर्म थेरेपिस्ट गायत्री नांदे यांनी परीश्रम घेतले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन क्रुती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अमित माळी यांनी केले.