Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आयुर्वेदिक औषधी सांगून रुग्णांना फसवणाऱ्या कंपन्यांना वचक कोण देणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

जळगाव-(धर्मेश पालवे)-आजकाल मनुष्याचे जीवन धकाधकीचे चालले आहे, चुकीच्या व धावपळीच्या जीवन पद्धतीने जनसामन्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्याच बरोबर बीपी, हृदयरोग,शुगर,दमा, अस्थमा, व जनुकीय तसेच संसर्गजन्य आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे. विविध आजाराच्या पासून सुटका होण्यासाठी रुग्ण मिळेल तो उपचार , मिळेल त्या दरात करण्यासाठी धावपळ करत असतात.याच कमजोरीचा व असहायतेचा गैर फायदा घेत काही औषधी कंपन्याकडून लवकरात लवकर बरे करून आराम देण्याचं सांगितले जाते, त्यातच औषधी चा व्यवसाय केल्यास यातून रोजगार ही उपलब्ध करून देतो अस सांगितल जात असते. रोजगार सह आरोग्य मिळेल या आशेने असंख्य लोक या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसत आहे.

त्याच बरोबर, कुठलेही औषध डॉक्टर शिवाय घेतल्यास होणाऱ्या अघटित संकटास ही रुग्ण जवळ करत आहेत, अवाजवी औषध घटकांचा दूरगामी परिणाम जसे अवसाद पडणे, हार्मोनल बदल, जननेंद्रिये तील बिघाड होणे, व प्रजनन संस्थेवर परिणाम होणे, आदी गंभीर कायम स्वरूपी समस्या उदभवू शकतात. विविध कंपन्या आपल्या प्रॉडक्ट च्या खपा साठी दहावी बारावी व वैद्यकीय तसेच औषधीशास्र विषयक ज्ञान नसणाऱ्या अप्रशिक्षित व विनाअनुभवी व्यक्तींना याबाबत मार्केटिंग करवून घेतात. रोजगाराच्या आड खूप मोठा समूह भल्या मोठ्या रुग्णांना आपल्या जाळ्यात अडकवून फसवणूक करत आहेत.सदर फसव्या कंपन्यांना fssi, बेस्ट सेलर, किंवा मार्केटिंग एक्सपर्ट अशी मानांकने असल्याचं दाखवलं जात असत. मात्र कोणत्याही कंपन्यांना उद्योग सुरू करताच काही महिन्यातच अशी प्रमाणपत्रे दिली गेल्याची वृत्त दिल्ली, मुबई, पुणे, नाशिक व इतर महानगर मध्ये उघड झाले आहेत. तरी नागरिकांनी सतर्क राहून डॉक्टरांनी दिलेले व सुचवलेले औषधी वापरात आणाव्यात व फसव्या औषधी पासून सावध राहावे हे महत्वाचे आहे. या अश्या औषधावर सरकार नियंत्रण ठेवेल काय? बेरोजगारीच्या या महाप्रलयाला या जंजाळातुन सुटका मिळेल का? रुग्णनांच्या असाहायतेचा फायदा घेणाऱ्यांना औषध प्रशासन वचक दाखवेल का ? अश्या असंख्य प्रश्नांकडे बोट दाखवत जणू आयुर्वेद आपली व्यथा मांडत असल्याचं म्हणणं वावगं ठरू नये.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्रौत्सव महोत्सव

Next Post

माधवबाग व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ह्रदय दिनानिमित्त आयोजित “स्वस्थ ह्रदयासाठी योग्य व्यायाम व योगासने” कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post

माधवबाग व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ह्रदय दिनानिमित्त आयोजित "स्वस्थ ह्रदयासाठी योग्य व्यायाम व योगासने" कार्यशाळा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo