<
राशन पावतीवर सही घेवुन, राशन कमी देऊन, पावती जमा
धरणगाव -(धर्मेश पालवे)- जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य वाटपाबाबत भ्रष्टाचाराचे पितळ अनेकवेळा उघडकीस आले आहेत. असाच काहीसा प्रकार धरणगाव तालुक्यातील दोनगावातील दुकानात होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.
सविस्तर असे की येथील स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपात कपात होत असून अपूर्ण धान्य वाटप होत असल्याची बोंब गावात आहे. सदर दुकान विकास सोसायटीच्या माध्यमातून चालवले जाते, तर या दुकानाचे सर्व अधिकार या सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील संभाळत असून गावातील संदीप पाटील नामक व्यक्ती सर्वेअर म्हणून काम सांभाळतात.
गेल्या आठवड्यात 30 तारखे पर्यंत राशन वाटप झाले असून वाटप करते वेळी, नागरिकांना राशन वाटपात गहू व तांदूळ नियमानुसार वाटप न करता कमी वाटप करण्यात आले आहे. तसेच वाटप केलेल्या राशन ची पावती नागरिकांना न देता ती पुन्हा सही अंगठा घेऊन परत दुकानात जमा करण्यास काही लोकांनी सांगण्यात आले आहे असे चित्र आहे. राशन वाटप करणाऱ्यास फोनवर विचारण्यात आले असता, आम्ही नियमानुसारच धान्य वाटप करत असून कोणतेही लपवा लपवी करत नसून वेळेवर पूर्ण राशन वाटप करतो, असे सांगत अजून माहिती असल्यास सोसायटीच्या माध्यमातून चालणाऱ्या या स्वस्त धान्य दुकान बाबत चेअरमन राजेंद्र पाटील यांच्याशी बोलून घ्या असे ही सांगण्यात धन्यता मानली. चेअरमन साहेबांना फोन लावला असता संपर्क होऊ शकला नाही दुकान चालकाने ही या बाबत गंभीरता पाळली नाही. मात्र, सरपंचाशी संपर्क साधला असता असा प्रकार होतोय अस मला तुमच्या कडून माहिती होत आहे, या बाबत चौकशी करून सांगतो असं ते सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले. गावातील काहींनी माहिती दििली व्हिडिओ बाईट देखील दिली आहे पण आमचेे नाव कुणाला सांगू नका आम्हाला त्रास दिला जाऊ शकतो असे देखील त्यांनी सांगितले. यावरून गावात स्वस्त राशन दुकानदाराची किती मुजोरी आहे हे मात्र लक्षात येत आहे. यावर पुरवठा विभागाच्या अधिकारी वर्गाकडून कारवाईची अपेक्षा होत आहे. पण पुरवठा विभागातील अधिकारीच यात सहभाागी असतील तर कारवाई होणार तरी कशी असा देखील प्रश्न गावकर्यांमध्ये निर्माण झाला आहे.