Wednesday, June 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/04/2026
in क्रीडा, जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक…

जळगाव क्रिकेट लिग बघण्यासाठी जैन ड्रीम स्पेसेस वर तुफान गर्दी..

जळगाव दि.१९ प्रतिनिधी – मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर सुरु असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेत रोमांच वाढत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग चा तिसऱ्या सामना अमळनेर सुहांस जायंटस विरूद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात खेळविण्यात आला. नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटस ने जिंकून कर्णधार शुभम शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. जळगाव कोगटा किंगच्या मजबुत फलंदाजीचे दर्शन आज पुन्हा घडले. पहिल्या चार ओव्हर मध्ये ४४ धावा ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी जोडल्यात. धोकादायक ठरत असलेल्या भागीदारीला गौरव ठाकूर ने जितेंद्र नाईकची विकेट घेत तोडली. यानंतर सामन्याचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेत १० उत्तूंग षटकार खेचत ८ चौकारांसह वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसले याने शतक ठोकले. अवघ्या ६५ चेंडूत १३० धावा करुन त्याने विक्रम रचला. त्याला अक्षय मेघानी २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करत चांगली साथ दिली. निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात जळगाव कोगटा किंगने २२० धावांचे विशाल लक्ष्य रचले.
पलटवार करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरवात अडखळत झाली. कर्णधार शुभम शर्मा ने एकतर्फी किल्ला लढवत ३९ चेंडूत ६८ धावा केल्यात त्या पाच चौकार व ४ षटकार लगावले. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा केला त्यासाठी त्याने तब्बल चार षटकार खेचले व एक चौकार लगावला. रणजीत निकम याने १५ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीन २५ धावा करून सामनात रंगत आणली. शेवटी ६ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंतच अमळनेर सुहांस जायंटसला मजल मारता आली. जळगाव कोगटा किंग संघाकडून मनिष चौहान ने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट पटकाविला. कर्णधार जगदीश झोपे, बिपीन चांगरे प्रत्येकी एक गडी बाद केला. जळगाव कोगटा किंग ३१ धावांनी विजयी झालेत. सलग दोन विजयांसह ४ गुण घेऊन जळगाव कोगटा किंग अव्वल स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ओम भोसले याला मिळाला. तर डॉट बॉल साठी राज बेलदार या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी दाल परिवारचे प्रेम कोगटा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल, नितीन पाटील यांची उपस्थीती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर, संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले. तर गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात..

Next Post

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

Next Post
जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जळगाव : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून बेमुदत संप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अधिकारी असावा तर असा….

अधिकारी असावा तर असा….

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाची भोकर येथे कारवाई; रेस्टॉरंटमधून अन्न नमुने जप्त

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

भवरखेड येथे बनावट दूध निर्मितीवर कारवाई; २६६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo