<
भडगाव-(प्रमोद सोनवणेे) – येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.संस्था,भडगाव,संचलीत गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथील खेळाडूंनी “छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव ” येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात यश मिळवत नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुलात पार पडणाऱ्या नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी आपले नाव पक्के केले आहे. स्पर्धेत “कु.मुस्कान ऐनोद्दीन शेख (१५०० मी.प्रथम ),कु.भावना भाऊसाहेब पाटील (१५०० मी. द्वितीय),कु.रुपाली राजेंद्र हिरे (४०० मी.हर्डल्समध्ये प्रथम तर लांबउडीत द्वितीय ), कु.निकीता अशोक सरदार (३००० मी.द्वितीय ), कु.ललीता रतनसिंग परदेशी (४०० मी.हर्डल्स द्वितीय )” यांनी यश मिळवले आहे.
यशस्वी खेळाडूंना व्यवस्थापिका म्हणून माया मराठे लाभल्या तर शिक्षक बी.डी.साळुंखे, आर.एस.कुंभार, राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे.
यशस्वी खेळाडूंचे या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,दुध फेडरेशनच्या संचालिका पुनमताई पाटील,मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, प्रभारी प्राचार्य संतोष माळी,पर्यवेक्षक टी.एस.पाटील, अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार, अरविंद देसले,चेतन भोसले,राहुल सोनवणे तसेच प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.