<
जळगाव-(विशेष) – शहरात खड्डे आहेत की खंड्यात जळगाव हे एक कोड्या प्रमाणे आहे. आता हे कोडे जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून योग्य उमेदवाराला मतदान करुन सोडवावे.
जळगाव शहरात फक्त “खड्डे” हाच एक प्रश्न नसुन असे अनेक प्रश्न आहेत. जे आजी-माजी आमदारांनी अद्यापही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मग एमआयडीसी असेल की, जनतेच्या प्राथमिक गरजा असतील, गेल्या पाचवर्षात जळगांव चा विकास झाला आहे असे गावभर सांगितले जात आहे. मात्र जळगाव करांना अद्याप तरी विकास गवसला नाहीये. नेमकं पाणी कुठे मुरतय या सर्व बाबींचा खुलासा जळगाव चे तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील हे त्यांच्या झंझावाती प्रचार दौरा दरम्यान जळगांव करांना सांगत आहेत.