<
एरंडोल(प्रतिनीधी)- आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ,मिसाईल मॅन ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रत्येक विचारातून प्रयत्नशील माणसाला नवी प्रेरणा लाभते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आलेल्या कलाम यांनी गाठलेली यशोशिखरे आपल्याला नेहमीच दिशादर्शक ठरतील. असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी भारताच्या या विज्ञाननिष्ठ माजी राष्ट्रपतीं डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवसानिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन उपक्रमाच्या निमित्ताने बोलताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा प्रवक्ते राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझर कर यांनी केले.यावेळी उपस्थित सर्व मुलांना छान छान गोष्टीचे पुस्तके मूल्यवर्धन याची पुस्तिकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, रेखा भील, अक्काबाई भील, राकेश माळी, सुभाष भील, सुनील आप्पा भील, काळू पवार सिमाबाई सोनवणे पिंट्या बाई भील, आदी मान्यवरांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की लहान मुलांनी मोबाईलच्या विळख्यात अजिबात अडकू नये त्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी वाडी-वस्ती तांड्यावर व दुर्गम आदिवासी भागात देखील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी छोटेसे आपले हक्काचे माझे छोटेवाचनालय असायला हवे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.