<
भडगांव – (प्रमोद सोनवणे) – राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, पी आर पी ( कवाडे गट ) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव शहरात वरची पेठ भागात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, सभेचे अध्यक्ष जेष्ठ नागरीक मा.हेमराज नाना पाटील तर प्रमुख वक्ते विधानसभा क्षेत्रप्रमुख पाचोरा मा.नितीन दादा तावडे, पाचोरा येथील नगरसेवक मा.विकास पाटील सर, तालुका प्रवक्ते मा.भूषण पाटील होते वक्त्यांनी आपल्या मनोगतातून होणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्यासाठी स्वाभिमानाची निवडणूक असून महाराष्ट्राचे जाणते राजे मा.शरद्चंद्रजी पवार साहेबांनी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली, तसेच बेरोजगारी,कर्जमाफी या मुद्द्यावर युती शासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले त्याचप्रमाणे मतदारसंघाचे विद्यमान आमदारांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर पालिकेच्या माध्यमातून झालेली कामे देखील आपल्या निधीतून झाली आहेत अशी खोटी बतावणी करतात, त्यांनी कुठलंही ठोस काम या मतदारसंघात केले नाही. भडगाव शहरातील मटण मार्केट ते खालची पेठ यांना जोडणारा पुलाचे आश्वासन हवेतच वीरल, भडगाव शहराला ज्या कच्च्या बंधाऱ्यामुळे पाणीपुरवठा होतो त्या बंधा ऱ्याचे पक्क्या बंधाऱ्यात देखील रूपांतर आमदारां कडून झाले नाही, वाघ कुटुंबीय गेल्या 55 वर्षांपासून जनसेवचे कार्य अविरतपणे करत असून प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दुःखात सहभागी होत असतात म्हणूनच मा.दिलीप भाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले, सभेस शहराध्यक्ष मा.शामदादा भोसले, नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, सुभाष दगा पाटील, भिकनूर पठाण,इसाक मलिक,डी डी पाटील सर,मोतीलाल नरवाडे, एस ए जाधव,ऍड.बाग,संजय पाटील,शंकर पाटील,बापु काळे,लोटन आप्पा पाटील,निमन शेख,अतुल देसले,कुणाल पाटील,अनिल टेकडे,योगेश महाजन,विवेक पवार, मोहसीन भाई, संदीप मनोरे,आकाश कंखरे, रवींद्र पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, दस्तगिर भाई, राजुभाऊ पाटील, संजय पाटील, वीरेंद्र पाटील, विशाल पाटील, चेतन पाटील तसेच समस्थ पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते.