<
विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरण पूरक १५० आकाश कंदील
जळगांव(प्रतिनिधी) आव्हाने शिवार येथील श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर तसेच मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल आव्हाने शिवार या शाळेत दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ या नावात दिव्यांची आरास करून कार्यक्रमात वेगळेपण बघायला मिळाले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक १५० आकाश कंदील बनविले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हर्षाली पाटील यांनी फटाके पासून होणारे नुकसान या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षकवृंद व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याची शपथ घेऊन फटाके मुक्त दिवाळी साजरी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ हर्षाली पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार सौ दिपाली परदेशी यांनी मानले. तसेच सौ.देशमुख, सौ जयश्री, सौ मोहिनी, श्री राहुल, श्री सद्दाम तडवी, कु.जयश्री मॅडम यांचे सहकार्य लाभले.