<
फैजपूर- (मलिक शकीर) – काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. (कवाडे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा रावेर तालुक्यातील रावेर शहरासह ग्रामीण भागात प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी रावेर शहरात प्रचंड प्रचार रॅली काढण्यात रावेर शहरासह ग्रामीण भागात शिरीष यांचे जल्लोषात स्वागत करून प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज दि १८/१०/२०१९ रोजी शिरीष चौधरी यांचा रावेर शहरासह तालुक्यातील भोकरी, करजोत, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, मंगरूळ, केऱ्हाळे बु, केऱ्हाळे खु या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, माजी आमदार अरूण पाटील, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा बँक माजी संचालक राजीवदादा पाटील, प्रल्हाद बोडे, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, सोपान पाटील, रमेश नागराज पाटील, काँग्रेस जिल्हा खजिनदार सुरेश सिताराम पाटील, काँग्रेस चोपडा तालुका उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी सी पाटील,रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके, रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील, मसाका माजी संचालक इस्माईल तडवी, यशवंत धनके गुणवंत टोंगळे, विनायक पाटील, सुधाकर पाटील,सुनील कोंडे,काँग्रेस आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी, लोहारा माजी सरपंच संजू जमादार, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, काँग्रेस अनु जाती विभाग कार्याध्यक्ष राजू सवरणे, चेतन चौधरी, हंबर्डी माजी सरपंच बलदार तडवी,रशीद रसूल तडवी, अकिल्उद्दीन फारुकी,हयात खान, इरफान मेम्बर, हाजी गुलाम, निसार खान, डॉ निसार, कलिम मेंबर चिनावल, रावेर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष विनायक महाजन, पी आर पी कवाडे गटाचे रावेर तालुका अध्यक्ष शांताराम तायडे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी. आर. पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना याआघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण रावेर शहरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत नगराध्यक्ष दारा मोहंमद, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,असउल्लाखान,नगरसेवक गोपाळ बिरपन, प्रकाश मुजुमदार, बंडू चौधरी, भिका राजपूत, कांतीलाल बुवा, अशोक प्रल्हाद महाजन, गंगाराम दाणे, अनिल अग्रवाल, चिंतामण दिवाजी, अशोक वाणी, शेख गयास, युसुफ खान, आरिफ बारदान, अब्दूल रशीद, कौसर शेख, राका मास्टर, मगबुल शेठ, शेख सादिक, अय्युब शेख, आसिफ मेंबर, महेमुद हाजी, आर बी महाजन सर, मधुकर महाजन , विजय लोहार, अशोक वाणी, एस आर चौधरी, शैलेंद्र अग्रवाल, विनायक महाजन, कैलास वाणी, भास्कर माळी, पी एस महाजन, विकास मराठे, मंजुर टेलर, महेंद्र गजरे, कालु शेठ, डॉ सुरेश पाटील, योगेश गजरे यांच्यासह रावेर शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिरीष चौधरी यांच्या प्रचार रॅली रावेर शहरातील विविध भागात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने व ठिकठिकाणी पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले रावेर शहरासह रावेर तालुक्यातील भोकरी, करजोत, अहिरवाडी, मोहगण, पिंप्री, मंगरूळ, केऱ्हाळे बु, केऱ्हाळे खु या गावांनाही शिरीष चौधरी यांच्या प्रचारात ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होवून प्रचंड प्रतिसाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास दिला यावेळी शिरीष चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मतदारांनी शिरीष चौधरी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.
शिरीष मधुकरराव चौधरी यांना राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात येत आहे असे पत्र शिरिष चौधरी यांना राजे प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष दिपकराज पाटील, रावेर तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील, यावल तालुका अध्यक्ष निलेश बेलदार यांनी दिले आहे. पाठींबा पत्र देतांना यावल पंचायत समिती गटनेता शेखर पाटील, राजे प्रतिष्ठानचे मयूर जैन, रोशन रमेश कोल्हे, आकाश सतिष महाजन, महेंद्र बेलदार, सागर बापू कोळी, तालुका प्रतिनिधी गौरव संतोष पाटील, तालुका संपर्क प्रमुख, वासुदेव संदीप चौधरी, अजय शंकर कोळी, अमोल साहेबराव महाजन, शरीफ गुलशेर तडवी, आकाश संजय पाटील, भुषण हेमंत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.