<
जळगांव-(प्रतिनीधी)-ध्वनी वायू प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात व सर्वत्र फटाके मुक्त दिवाळी साजरी व्हावी व पर्यावरणाचे देखील संवर्धन व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी केले आहे.फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते शोषणाचे फुपुसाचे डोळ्यांचे विकार जडतात रक्तदाब वाढतो हृदयविकाराचा झटका व निद्रानाश संभवतो फटाके फुटल्यानंतर त्यातून मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असे वायू बाहेर पडतात पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने मानवी आरोग्य धोक्यात येते त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हा एक चांगला पर्याय असून यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सालाबादाप्रमाणे यंदाही त्यांनी मोहीम राबवून म्हटले. तसेच दिपवाळी हा उत्सव प्रकाशाचा व आनंदाचा असून प्रत्येकाच्या जीवनात विकासाचा व प्रगतीचा प्रकाश यावा,दीपावली च्या दीपोत्सव निमित्त सर्वांना शुभेच्छा देतानाच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सर्व आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतानाच स्पर्धा म्हटली म्हणजे निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात कोणीतरी एक जिंकणारा असतो बाकी सर्वांना हार पत्करावी लागते परंतु जिंकणार यांनी हरणार यांना शुभेच्छा द्याव्यात , हरलेले यांनी जिंकणार यांना शुभेच्छा द्याव्यात ही आपली वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा निर्माण व्हावी आणि निवडणुकीपुरते राजकारण आहे असे समजून निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपल्यानंतर सर्वांनी राज्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वांच्या जीवनात शांतता प्रसन्नता आरोग्य व आनंद निर्माण होण्यासाठी एकत्रित येऊन खिलाडूवृत्ती जोपासत समन्वयाने काम करावे असे चित्र तयार व्हावे असे देखील किशोर पाटील कुंझरकर यांनी योगायोगाने दिपवाली च्या पार्श्वभूमीवर आलेल्या व झालेल्या सार्वत्रिक विधानसभा २०१९ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटले. माणूस म्हणून सर्वजण सारखेच असून जात-पात धर्म पक्ष पंथ या पलीकडे सर्वांनी माणूसपण जपण महत्त्वाचे आहे, देश महासत्ता होण्यासाठी व आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रराज्य देशात सर्व क्षेत्रातप्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वांनी माणूस म्हणून माणुसकी जोपासावी व सर्व गट-तट भेदभाव द्वेषभाव विसरून समन्वयाने राहावे असे आवर्जून कुंझरकर यांनी म्हटले.