<
मुंबई -परतीच्या पावसाने बळीराजाला अक्षरश: रडवलंय. पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. याच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक प्रचाराचा झंझावात संपवून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.
शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना भेट दिली आणि तेथील शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेतल्या. आमच्या हातचं पीक गेलंय, खूप नुकसान झालंय, जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं या शेतकऱ्यांनी सांगितल्याचं पवारांनी सांगितलं आहे.
परतीच्या पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तडे जाऊन मणी गळून पडत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची देखील पवारांनी भेट घेतली आणि त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या.