जळगांव(प्रतिनीधी)- जि.प.जळगाव येथिल शिक्षण विभागातील उपशिक्षण आधिकारी (माध्य.) श्री.शिवदे साहेब यांनी वाढदिवस अनाथ, निराधार मुलांच्या संस्थेत साजरा केला. या निमित्ताने त्यांनी मुलांशी संवाद साधला व जिद्दीने मेहनत करुन प्रगती करण्याविषयी मार्गदर्शन केले. आणि बालकांच्या शैक्षणिक, क्रिडाविषयक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या, वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक एस.पी.देवरे यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या प्रसंगी के.एन.वायकोळे शिक्षण विस्तार अधिकारी (माध्य) जि.प.जळगाव हे उपस्थित होते. त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. आणि मुलांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक एस.पी.देवरे, एम.एम.काझी, एस.पी.बच्छाव, व्ही.आर.पाटील, यु.पी.चव्हाण, एस.ए.पाटील, बी.टी.पाटील, पी.बी.पाटील उपस्थित होते. संस्थेत वाढदिवस साजरा केल्यामुळे संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, ऋषीकेश ठाकरे, सारीका पाटील यांनी परिश्रम घेतले.