जामनेर-(भगवत सपकाळे)-यंदा सतत धार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्याला न्याय मिळावा यासाठी जामनेर तालुक्यातील कुंभारी बु येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी व महायुवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी “शेतकऱ्याला काळया पाण्याची शिक्षा” हे आंदोलन केले.
सरकार ने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याला भरीव रक्कम म्हणून हेक्टरी ६० हजार रुपये द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी”शेतकऱ्याला काळया पाण्याची शिक्षा” म्हणून सलग दोन दिवस काळया पाण्यानी भरलेल्या टाकीत माहायुवा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे यांनी उभे राहून आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपात हिरावून घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून प्रभाकर साळवे यांचे आंदोलनाला मा तहीलदारांसह प्रशासनाचे मंडळ अधिकारी एस एस पवार यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन देण्यात आले, मात्र नवे सरकार स्थापन होवून दहा दिवसात लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोनाचा इशारा या वेळी देण्यात आला.