एरंडोल(प्रतिनीधी)- मौलाना अबुल कलाम आझाद केवळ भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री नव्हते तर ते सच्चे राष्ट्रभक्त व स्वातंत्र्य सेनानी होते. ते नामवंत शिक्षणतज्ञ, कवी संपादक व शिक्षणाचा पुरस्कार करणारे थोर समाजसेवक भारत रत्न होते असे प्रतिपादन मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३१व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षण दिन छोटेखानी उपक्रमांतर्गत बोलताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिनांक 11 रोजी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सुरेश भिल, सुभाष दादा भील, सुनिल आप्पा भील, सखाराम सोनवणे, राकेश माळी, रेखाताई भिल, सीमाताई सोनवणे, काळू पवार, शशिकांत सोनवणे, नरेश बागुल, राजु बारेला, बाप्पू पवार आदीं मान्यवरासह विद्यार्थी पालकांची उपस्थिती होती. पुढे बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ४नोव्हेंबर २०१९रोजी महाराष्ट्र शासनाचे कक्षाधिकारी आदरणीय नेहा हुमरसकर यांनी एक पत्रक काढून यंदादेखील सालाबादाप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त सर्वत्र शैक्षणिक परिसंवादाचे निर्देश दिलेले आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य आणि सर्व शाळांमध्ये उपक्रम घेण्याची सुचवलेले आहे. एरंडोल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सर्वत्र राष्ट्रीयशिक्षण दिन साजरा होत आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाज व्यवस्थेतील सर्व घटकांनी सु समन्वयाने एकत्रित येऊन शिक्षणाचा दिवा अधिक प्रज्वलित करण्यासाठी कार्य करण्याची व संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण सर्वांग विकासाचे प्रवेशद्वार आहे.म्हणून आज सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची कास धरण्याची शपथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर येथे देण्यात आली. समाजव्यवस्थेत तळागाळात अजूनही शिक्षणाविषयी कार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसह माता पालक समिती शिक्षक-पालक संघ शाळा व्यवस्थापन समितीने परिश्रम घेतले.