<
अहमदनगर(प्रतिनिधी)- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व असंघटित सामान्य माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील सर्वच माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा राज्य स्तरीय कार्यकर्ता मेळावा येत्या रविवारी २१ जुलै २०१९ आयोजित करण्यात आला आहे . मेळावा व चर्चासत्र राळेगणसिद्धी अहमदनगर येथे आयोजित केला असून वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत राहिल. सोबतच कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात विशेष बाब म्हणुन माहितीचा अधिकार कायद्याचे प्रणेते व जेष्ठ समाजसेवक माननीय श्री अण्णाजी हजारे यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याचे मुख्य आयोजक राहुल कदम यांनी दिलेल्या माहिती नुसार या मेळाव्या साठी नोंदणी सुरु आहे (१९ जुलै दुपारी १२:०० पर्यंत). या मेळाव्यात माहिती अधिकार कार्यकर्तेची दशा आणि पुढील दिशा , माहिती अधिकार कायदा आणि कार्यकर्ताच्या समोरील आव्हाने , राज्य माहिती आयोग खंडपीठात अपिलावर सुनावणीसाठी होणारा २-३ वर्षे उशीर यावरिल उपाययोजना, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या वरिल वाढते हल्ले व खोटे खटले, सरकारी अधिकारी वर्गाचा वाढता मुजोरपणा , भ्रष्टाचारचा वाढत चाललेला भस्मासुर, माहिती आयुक्त यांचे चुकीचे निर्णय व मनमानी कारभार , माहिती आयुक्त याच्या कोर्टरुम मध्ये चारही दिशेला सीसीटीवी कॅमेरे लावुन त्याची आडियो व व्हिडिओ पुढील पाच वर्षा करिता जतन करने, कलम १८/१ अंतर्गत तक्रार केल्या नंतर नियमानुसार दंडात्मक कार्रवाई करून नुकसान भरपाई २५००० हजार प्रमानेच देने, दोषी जनमाहिती अधिकारी यांचेवर चौकशी बसवुन दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाईचे आदेश देने, कलम ३५३ बाबत मत मांडने, मा. अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन , सोबतच ऐनवेळी येणारे विषयांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे .
मेळाव्याचे ठिकाण:- RTI ट्रेनिंग हॉल, राळेगणसिद्धी ता. पारनेर जिल्हा:- अहमदनगर
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राहुल कदम (अहमदनगर) 9503929397 , जितेंद्र विंचू नाशिक 99236 43989, शेखर कोलते (नागपूर) 77983 88753, राहुल अवचट (पुणे) 9890007025 , अजय तुम्हे 97644 86639 यांच्याशी संपर्क साधावा. माहितीचा अधिकार कायद्यासाठी कार्य करणारे महाराष्ट्र राज्यातील सर्वच कार्यकर्ते, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आव्हान केले आहे .