<
जळगाव, दि.19 :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते स्व. इंदिराजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जळगाव शहर मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनीही पुष्प अर्पण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तुकाराम हुलवळे, तहसिलदार शरद मंडलिक, माणिक आहेर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच आवारातील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.