जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र कल्चरल सेंटर व नाटकघर आयोजित “परिवर्तन कला महोत्सव” पुणे येथे दि. २४, २५ , २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला असून हा महोत्सव दि. ३, ४ व ५ जानेवारी २०२० या कालावधीत होणार आहे. परिवर्तनने निर्मित केलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण या महोत्सवात केले जाणार आहे.