<
जळगाव(प्रतिनीधी)- सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करुन नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना सुरु केली असुन सदर योजना अन्यायकारक असुन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा ह्या योजनेस विरोध असुन गेल्या पाच वर्षात आपल्या संविधानिक मागणी मान्य व्हावी म्हणुन अनेक मोठी आंदोलन करण्यात आली असुन शासनाने त्याची दखल घेतलेली नाही, नुकताच शासनाने आदेश काढुन DCPS धारक कर्मचाऱ्यांना NPS मध्ये वर्ग करण्याचा घाट रचला आहे. DCPS योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन १० टक्के रक्कम कापली जाते व शासनही १०टक्के रक्कम जमा करते, परंतु जमा झालेल्या रकमेचा कुठलाही हिशोब नाही,पावती मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पैसा कुठे आहे हेच माहीत नाही. NPS मध्ये वर्ग करण्याआधी DCPS मध्ये जमा झालेल्या रकमेचा संपुर्ण हिशोब येत्या पंधरा दिवसात देण्यात यावा अन्यथा येत्या २१ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद जळगाव येथे घंटानाद आंदोलन करणार आहेत अशी माहीती लोकेश पाटील जळगाव तालुकाध्यक्ष यांनी दिली.त्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने पंचायत समिती जळगाव येथे गट विकास अधिकारी सोनवणे साहेब व गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना लोकेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष गोविंदा ठाकरे, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, जिल्हा सल्लागार विपिन पाटील, जिल्हा संघटक राकेश पाटील, जिल्हा कोषागार मुजबर रहेमान, राज्य समन्वयक महेंद्र देवरे, सुनील ढाके, अतुल पाटील, तुषार सोनवणे, दशरथ पाटील, शितल चौधरी, ज्योती महाजन, विद्या वसईकर, योगीता मराठे, सोनल कोठावदे, पुनम शिंपी, लीना बडगुजर, प्रीती चौधरी आदी उपस्थित होते.