<
लवकरच सात बलून बंधाऱ्यांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळणार
जळगाव(प्रतिनीधी)- खान्देशच्या सिचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना लवकरच मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. यावेळी जलशक्ति मंत्री गजेद्र शेखावत यांनी या विषयांवर खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असून या विषयाची माहिती घेतली आहे. श्री. पाटील यांनी सात बलून बंधाऱ्यांची आवश्यकता विशद केली. येत्या पंधरवड्यात तात्काळ सात बलून बंधाऱ्यांना प्राधान्याने मान्यता प्रदान करण्याचे केंद्रीय मंत्री शेखावत आशवस्त केले. खासदार उन्मेष पाटील यांनी सात बलून बंधारे पूर्ण करणेसाठी मी कंबर कसली असून या बंधाऱ्यामुळे खान्देश मध्ये जलक्रांती होईल. तसेच हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली आहे.दृष्टिक्षेपात सात बलून बंधारे मेहूणबारे, बहाळ ( वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून यामध्ये साचणारे पाणी : २५.२८दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने साचणार असून यासाठी सुमारेअपेक्षित खर्च : ८४१ कोटी, १५ लाख येणार आहे. या बंधाऱ्यामुळे एकूण ४४८९ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीतील पाणी बंधारे नसल्याने वाहून जाते. त्यामुळे गिरणा धरणापासून पुढील बाजूस असलेल्या नदीवर सात बलून बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर यापूर्वीच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते. धरणापासून तापी पर्यंत नदीच्या वाटेत कोठेही पाणी अडवले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी अडवले जाऊन त्याचा सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी खासदार उन्मेश पाटील या विषयाला प्राधान्य देत भक्कम पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यातील मेहुणबारे, बहाळ, परधाडे यासह इतर सात ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. त्या भागातील नदी पात्रात बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने यापूर्वीच वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र यापूर्वी उपलब्ध झाले आहे. बधांऱ्यांच्या जागेसाठी सर्वेक्षण होऊन जागा निश्चिती देखील झाल्या आहेत. यासाठी बांधकामाचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. जिल्ह्याचे अभ्यासू खासदार उन्मेश पाटील यांच्या धडाडीमुळे हे सात बलून बंधारे पूर्णत्वास येतील असा विश्वास शेतकरी बांधवांमध्ये चर्चिला जातो आहे.