<
जळगाव(प्रतिनीधी)- येथील प्रगति विद्यामंदिर शाळेत येत्या २३तारखेला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गणानां व त्यांच्या कौशल्यपूर्ण तसेच कुशाग्र बुद्धिला चालाना मिळावी म्हणून शाळा नेहमी विविधांगी उपक्रमांचे आयोजन करत असते.त्यातील एक प्रयत्न म्हणजे विज्ञान प्रदर्शन आज वर्गशिक्षक मनोज भालेराव यांनी कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहित्याची नवनिर्मिति कशी करता येते व विविध सहित्याचा उपयोग आपण किती विविधतेने करू शकतो या विषयी मार्गदर्शन केले. त्यानी विद्यार्थांसोबत बसून त्याना विविध साहित्य बनविन्यात मदत करून हवे ते मार्गदर्शन केले. यात विद्यार्थानी औद्योगिक विकास, भविष्यातील वाहतूक व दळणवळण नियमन, स्वछता, आरोग्य व पर्यावरण, कृषि व कृषि पद्धती, संसाधन व्यवस्थापन, गणितीय प्रतीकृती इ विषयावर आधारित प्रतिकृति बनविले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगलाताई दुनाखे व मुख्याद्यापक शोभा फेगडे, यानी कार्यशाळेतील विद्यार्थाना मार्गदर्शन करून कौतुक केले. यात प्रयोगशाळा सहाय्यक विजय चव्हाण आदी यांनी परिश्रम घेतले.