<
पाळधी/जळगांव(प्रतिनीधी)- सूर्या फाऊंडेशन संचलित, नोबल इंटरनॅशनल स्कुल पाळधी येथे खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या पुण्यतिथी निमीत्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कुलच्या अध्यक्षा सौ.अर्चना सूर्यवंशी व श्री. प्रशांत सूर्यवंशी यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी व हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले. या वेळी शाळेचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी यांच्या काव्य रचने विषयी तसेच हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद कश्या प्रकारे अवघड परिस्थितीत भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या तिन्ही ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी केलेल्या कार्याची महती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळेस विद्यार्थ्यांनी खान्देश कन्या कवयित्री बहीणाबाई चौधरी, हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जिवन चरित्रावर आपली मते मांडली. या वेळी विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या वाचन केले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.