<
गरिब व गरजूंना दिली मायेची ऊब
जळगांव(प्रतिनीधी)- स्वत:आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य, ना गडगंज संपत्ती,तरीही समाजाबद्दल हृदयात निरंतर वाहणारा आपुलकीचा झरा आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अस्वस्थ होणाऱ्या शहरातील मौलाना आझाद फाउंडेशनच्या सदस्यांनी थंडीत रस्त्यांवर कुडकुडणाऱ्या अनेक निराधार जीवांकरिता ब्लँकेटचे वाटप करून माणूसकीची उब निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या थंडी वाढत आहे. दोन दोन ब्लँकेट घेऊनही घरात थंडी आवरत नाही. निराधार असलेल्या व्यक्तींना अशावेळी रस्त्यावर कुडकुडत रात्र काढावी लागते. ते थंडीचा कसा सामना करत असतील? याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यांनाही जीव आहे, त्यांनाही थंडीत ऊब पाहीजे हीच जाणीव ठेवून मौलाना आझाद फाउंडेशनने शहरातील चिमुकले राम मंदिर, रेल्वे स्टेशन, सिंधी काँलनी, व आश्रमात निराधार व गरजूंना १२० ब्लँकेट वाटप केले. सध्या थंडीचे वातावरण आहे. तसेच निराधार व गरजूंना देखील ऊब मिळावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गरजवंतासाठी काही तरी करायचे असे ठरवले व थंडीत कुडकुडणाऱ्या निराधार गरजवंताना ब्लँकेट द्यावे असे आम्ही ठरवले आणि त्यासाठी सुरूवातही केली आहे. समाजाप्रती काही तरी देणे लागतो, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे गेल्या काही वर्षांपासून आम्ही अदोदित व निरंतर मौलाना आझाद अल्पसंख्याक फौंडेशन च्या माध्यमातून राबवित आहोत.या उपक्रमाद्वारे फौंडेशन समाजाला असे आवाहन करते की आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा असे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी, फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख यांच्या सह प्रविण पाटील, दिपक सपकाळे, अमित माळी, मनोज भालेराव, योगेश पवार, चेतन निंबोळकर, गणेश जोशी, मिना परदेशी आदी उपस्थित होते.या उपक्रमाला चंद्रकांत पाटील, नानक तलरेजा, सुवर्णलता अडकमोल यांचे अनमोल सहकार्य लाभले.