<
इरावती कर्वे यांचा जन्म रंगुन (ब्रम्हदेश) आजचे म्यानमार येथे 15 डिसेंबर 1905 रोजी झाला. जन्मानंतर त्यांचे गाव गंगा ठेवले गेले. परंतु जवळच्या एका नातेवाईकाने त्याच्या मुलीचे जन्मत: गंगा ठेवले आहे हे समजल्यानंतर इरावती हे नाव ठेवण्यात आले. इरावती कर्वे यांच्या वडिलांचे नाव हरि गणेश करमकर तर आईचे नाव भागीरथीबाई होते. नोकरी निमित्ताने ते मुंबई नंतर ब्रिटीश ऑईल कंपनीत ब्रम्हदेश (आताचा म्यानमार) येथे गेले. इरावतीबाई यांना 5 भाऊ होते. हरि गणेश करमकर हे कोकणस्थ असूनही खंबीर व आशावादी वृत्तीचे होते. त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले. मुलांमध्ये विद्या,व्यक्तीमत्व विकास, आदर्श त्यांनी मुलांमध्ये निर्माण केले. याशिवाय आपल्या मुलांवर डोळस वृत्ती, वास्तव दृष्टीकोन आणि भरपूर प्रयत्न, इमानीपणा, श्रध्दा, चिकित्सक वृत्ती त्यांनी मुलांवर रुजविली. वयाच्या 7 व्या वर्षी इरावतीबाई पुण्यात आल्यात. पुण्याच्या प्रसिध्द हुजूरपागा या प्रसिध्द शिक्षण संस्थेत झाले. हुजूर पागेतील बालिकादर्श अंकात इरावती बाईंची भिकारण कविता प्रसिध्द झाल्या. आणि लहान वयात इरावतीबाईंचे लेखणगुण दिसले.
शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात इरावतीबाई बर्याच काळ फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रसिध्द गणितज्ञ रँग्लर आप्पासाहेब परांजपे यांच्याकडे राहत. आप्पासाहेबांच्या वैयक्तीक आचार विचार व घटातील वातावरणामुळे इरावतीबाईचे भावी आयुष्य घडविले गेले. आप्पासाहेबांच्या देखरेखीखाली त्यांनी भरपूर इंग्रजी वाड:मय वाचले. यात प्रामुख्याने स्पेन्सर, मोर्ले,मिल, जेन ऑस्टिन, गोल्डस्मिथ होते.
इ.स. 1922 सालामध्ये इरावतीबाई मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी अर्थातच फर्ग्युसन महाविद्यालयात आल्या. इरावती बाईंचा रंग लालवट गोरा,बांधा धिप्पाड उंची पाचफुट सहाइंच डोळे निळे व चमकदार होते. चालण्यात चपळता आणि बोलण्यात आत्मविश्वास होता. 1926 साली बी.ए. तत्वज्ञान विषय घेऊन महाविद्यालयात प्रथम आल्यात. नंतर 1925 साली डॉ. गोविंद धुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणस्थ चित्पावन ब्राम्हणांचे मानववंश शास्त्र दृष्ट्या संशोधन हा प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला. पुढे 1928 ते 1930 या काळात जर्मनीत मानवंश शास्त्राचे उच्च पातळीवरुन अध्ययन केले.
“मनुष्याच्या कवटीची अरुप प्रमाणता” या विषयावर पी.एच.डी. मिळविली. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शन होते. डॉ. युगन फिशर या संशोधनामुळे इरावतीबाई जगभर प्रसिध्द झाल्यात.
या काळात दिनकर धोंडो कर्वे अर्थात महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे सुपुत्र यांच्याशी जर्मनीत ओळख झाली आणि पुढे प्रेम विवाह. त्याकाळात हा प्रेम विवाह खूप गाजला. आधुनिक दृष्टी हे कर्वे कुटुंबाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच इरावतीबाईंनी आयुष्यभर मंगळसुत्र न वापरणे, कुंकु न लावणे, बांगड्या न घालणे या गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला. तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांचे मन अलिप्त झाले असावे असे वाटते त्यामुळे इरावतीबाई स्त्री स्वातंत्र्याविषयी त्यांचे आचार विचार अतिशय स्पष्ट व सुचक होते. सांसारिक जीवन जगतांना त्यांना महाराष्ट्रीयन आणि मन मात्र जीवंत ठेवले. अतिशय कर्तबगार स्त्री असून देखील प्रत्येक स्तरावर प्रत्येक नात्याला त्यांना पूर्णपणे जपले तत्वाने निभावले सुध्दा.
जर्मनीहून परत आल्यानंतर इरावतीबाईंनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलसचिवाची जबाबदारी घेतली. आणि तेथे काम केल्यानंतर शेवटी 17 ऑगस्ट 1939 रोजी इरावतीबाई डेक्कन महाविद्यालयात रुजू झाल्यात. डेक्कन महाविद्यालयात त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लिखाण केले. स्वतंत्र वृत्तीने वास्तव सत्य रुपाने त्यांनी घटना मांडल्यात. त्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. खेडे, शहरे, नद्या, डोंगरे, मंदिरे,यात्रा,जत्रा उपाशी अनेक अडचणी सहन करुन त्यांनी विविध विषयांवर संशोधन केले. 30 वर्षे त्यांनी डेक्कन महाविद्यायात विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. त्यांच्या श्रध्दा भारतीय संस्कृतीच्या श्रध्दा होत्या. म्हणूनच आधुनिक ज्ञान व दूरदृष्टी यांचा समन्यव त्यांनी साधलेला आहे. इरावतीबाईंचे व्यक्तीमत्व बहुमुखी होते. बुध्दीनिष्ठता व भावनिष्ठता हे त्यांचं खरं रुप होते.
जात हा सामाजिक गट दुसरे तिसरे काही नसून एक नाते समुह आहे. हा सिध्दांत मांडणार्या डॉ. इरावती कर्वे या पहिल्याच संशोधक आहे. त्यांचे संशोधन प्रथम दर्जाचे आहे. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, हिंदू समाज रचना, स्त्री विषयक प्रश्नात प्रामुख्याने महाभारतकालीन स्त्रीयांचे प्रश्न, कुटुंब व्यवस्था, विवाह व्यवस्था, स्त्रीजीवन स्त्रीमन हे त्यांचे केंद्रस्थानी विषय होते. स्त्रीमुक्तीसाठी त्यांनी स्त्री-पुरुष या दोन्ही वर्गाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून युगान्तची निर्मिती झालेली दिसते.
आजन्म अभ्यास, विवेचन, चिकित्सकपणा, संशोधन डोळसवृत्ती, साहित्य, लालित्य यामुळे इरावतीबाईंचे कार्य अखिल जगात गाजले. समाजाबद्दलची आत्मियता, श्रध्दा, ओजस्वी वाणी, उत्तम प्रकृती, निडर स्वभाव अशा गुणांमुळे आणि उत्स्फुर्त संशोधनामुळे इरावतीबाई जीवनाच्या अखेरपर्यंत नम्र उपासक म्हणून जगू शकल्यात. शालेय व महाविद्यालयात त्यांना दक्षिणा, एम्सली हॉर्निमन शिष्यवृत्ती मिळविणार्या त्या पहिल्याच स्त्री विद्यार्थीनी व संशोधिका होत्या. जागतिक स्तरावर कार्य करतांना मानव शास्त्र व मानवंश शास्त्रा त्यांनी जे योगदान दिले ते ऐतिहासिक म्हणावे लागेल. कारण सायन्स काँग्रेसच्या मानववंश शास्त्र विभाग अध्यक्षा नवी दिल्ली 1947, लंडन विद्यापीठात मानसशास्त्राच्या व्याख्यात्या 1955, द. आफ्रिकेत भरलेल्या प्रांगणात हासाच्या काँग्रेसमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व त्यांनी केले.त्यात त्यांना अनेक मानसन्मान मिळालेत.
इरावतीबाईंच्या साहित्यात स्त्रीमानेचे हजारो विषय येतात, आणि समर्थपणे त्यांनी ते लिहिलेले आहे. खरंतर इरावतीबाई या ज्ञानगंगा होत्या. भाषाशास्त्र मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, साहित्य, इतिहास, समाजशास्त्र तत्वज्ञान इ. अनेक विषयांवर मौलिक संशोधन व कार्य त्यांनी केलेले आहे. एक प्राध्यापिका,ज्ञानतपस्वी संशोधिका, कर्तव्यदक्ष गृहिणी आदर्शमाता, आधुनिक विचारांची ज्ञानगंगा, मनस्वी प्रेमळ आणि सढळ हाताने मदत करणारी सत्याच्या बाजूने सतत लढणारी दुरदृष्टीची तत्ववेत्ता जिज्ञासू वृत्तीची ज्ञान तपस्विनी अशा अनेक रुपात इरावतीबाईंचे कार्य थोर आहे. 1991 मध्ये पुणे विद्यापीठात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदर्शन भरविले. तर 1973 साली डेक्कन महाविद्यालयात त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. व त्यांच्याच नावाने वस्तुसंग्रालय उभारले. समाजशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहिल. 11 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा मृत्यू पुणे येथे झाला.
प्रा.नारायण कोंडाजीराव पवार
सरचिटणीस जळगांव जिल्हा
इतिहास शिक्षक महामंडळ, जळगांव
मो.- 9881522523