<
जळगांव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व ग्रामीण विकास शिक्षण संस्था, नाशिक या संस्थेतर्फे जळगांव येथे २७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परीषदेत राज्यस्तरीय पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृक्ष प्रेमींचा गौरव समारंभात आमदार सुरेश भोळे व नेहरू युवा केंद्र कर्नाटक चे संचालक अतुल निकम यांच्याहस्ते येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांना ‘पर्यावरणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फिरोज शेख येथे जळगावात वास्तव्यास असुन त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवडीत मोठा सहभाग घेऊन पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवुन जळगांव येथे २७ रोजी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फिरोज शेख हे फाऊंडेशनच्या माध्यमातून गोर गरीब बांधवांना मदत तसेच समाजहिताचे भरपूर असे उपक्रम घेत असून त्यांचे मोठे कार्य आहे. पुरस्कार घेतेवेळी फाऊंडेशनचे चेतन निंबोळकर, दिपक सपकाळे, मनोज भालेराव, गणेश जोशी उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.