<
स्वतः जगत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे फिरोज शेख
जळगांव(चेतन निंबोळकर)- मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. अनेक प्रकाराने त्याला समाजाप्रती बांधिलकी ठेवावीच लागते. ही बांधिलकी जोपासण्यासाठी माणसाच्या रक्तात सेवेचे हिमोग्लोबीन सतत झरावे लागते. अशीच एक गोष्ट आहे समाजसेवेचे व्रत घेणारे आणि ते सांभाळणारे तसेच आपल्या वडिलांकडून मिळालेला हा वारसा जपणारे मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख यांची….. फिरोज शेख यांनी त्यांचे वडील रफिक शेख यांचे वस्त्रदानाचे उल्लेखनीय कार्य रस्त्यावरील फिरणारे निराधार यांना स्व:खर्चाने वस्त्रदान हे कार्य खूप जवळून बघितले आहे. याच कार्याची प्रेरणा घेत मी त्यांनी वयाच्या २०व्या वर्षी मी त्यांनी शिक्षण घेतलेल्या मराठी मुलांची शाळा मेहरुण या शाळेत १५ ऑगस्ट २००१ स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ४५० विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करुन समाजसेवेची सुरुवात केली. तसेच ते तीथेच न थांबता सामुहिक विवाहमध्ये आर्थिक योगदान, गरीब वस्तीत अन्नदान, बालनिराधार गृहात वाढदिवस साजरा करुन त्यांना शालेय साहित्य वाटप तसेच विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी अल्प स्वरुपात आर्थिक मदत करणे असे भरपूर कार्य त्यांनी वैयक्तिक स्तरावर केले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून भेटी-गाठीतून समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणार्या समाजसेवक, संस्थाचालक यांच्याशी ओळख परिचय वाढत गेला. ते करत असलेले वैयक्तिक कार्य हे कार्य एखाद्या हक्काचे व्यासपीठ स्थापन करुन त्यामध्ये काही समाज कार्याची आवड असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन त्यांनी ४ डिसेंबर २००० रोजी मौलाना आझाद फाऊंडेशनची स्थापना व नोंदणी करुन त्यांच्या कार्यास जोमाने सुरवात केली. कारण त्यांच्याकडे हक्काचे व्यासपीठ व ९ सदस्यांचे १८ हात त्यांच्या पाठीशी व सोबत खंबीरपणे होते व समाजातील नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना मिळत होते. त्यातच त्यांची लहानपणापासून समाजसेवा करण्याची त्यात भर म्हणजे मला थांबायचे नाही हा निश्चय त्यातून त्यांचे कार्य वाढयला लागले. त्यांना पुढे सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतांना निदर्शनास आले की, पर्यावरण क्षेत्रात सुध्दा कार्य करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात होणारा उकाडा, मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, अल्पस्वरुपात पाऊस पडणे यासारख्या पर्यावरणावर होणारा बदल निदर्शनास आले. त्यानंतर पर्यावरण हे मानवी जिवनासाठी किती आवश्यक आहे व आपण त्यासाठी काय केले पाहिजे याकडे त्यांनी पर्यावरण क्षेत्रात कार्य करण्याचे मी ठरवले. समाजाचे देणे म्हणून आपण समाज कार्य करत आहोत, पण त्याचबरोबर हे पण कार्य महत्वाचे आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. आणि त्यांनी पर्यावरण क्षेत्रात आपल्या कार्याची सुरवात जळगांव शहरातील पोलिस अधिक्षक कार्यालय समोरील भागात ५० वृक्षाची लागवड करुन केली. त्यानंतर शहरात भरपूर ठिकाणी वृक्षारोपण, वृक्ष वाटप, वृक्ष लागवड बाबत जनजागृती रॅलीचे आयोजन, पाणीबचत जनजागृती पोस्टर्स, वसुंदरादिनानिमित्त विविध उपक्रम शाळेत व नागरिकांना या विषयी माहिती देत शहरातील झोपडपट्टी भागातील नळाला नळबंद करण्याचे उपकरणे बसविण्यासाठी आव्हान त्यांनी या माध्यमातून केले. तसेच त्यांनी वट पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना वटवृक्ष वाटप करुन त्यांना पर्यावरणाची माहिती दिली. अशा पध्दतीने त्यांनी हळूहळू सामाजिक,शैक्षणिक क्रीडा, पर्यावरण, सांस्कृतिक इ. क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शासनाच्या ३२ कोटी वृक्षरोपण संकल्पनेस प्रतिसाद देत हातभार म्हणून स्वत: निर्मित केलेल्या वृक्ष-वाटीकेतून १०० रोपे अक्सा नगर, मास्टर कॉलनी, मेहरुण या भागातील नागरिकांना वृक्षारोपणासाठी मोफत दिले आहे. त्यांच्या संवर्धनासाठी घर तेथे वृक्ष हा उपक्रम राबवून प्रत्येक घरातील एका व्यक्तीस त्या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी दिली व वेळोवेळी पाहणी केली. यामध्ये त्यांनी सर्वात जास्त ऑक्सीजन देणार्या वृक्षांची लागवड केली. त्यांच्या अशाच उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा राज्यभरातून विविध संस्थांनी गौरव केला आहे.असाच त्यांचा व त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून असलेला समाजसेवेचा प्रवास इतरांना आदर्श व प्रेरणादायी ठरणारा आहे.