<
हेमांगी टोकेकर यांनी श्री स्वामी समर्थ विद्यालयात प्रबोधन कार्यक्रम घेतला
जळगांव(प्रतिनीधी)- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी )पुणे, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण या विभागाची सवयत्ता संस्था या संस्थेअंतर्गत सारथी पुणे यांच्या अंतर्गत तीन जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान सावित्रीबाई आणि जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जागर स्त्री शक्तीचा हा सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सारथी संस्थेच्या तारादुत प्रकलपा अंतर्गत तारादुत हेमांगी किशोर टोकेकर यांनी आज ३ रोजी श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय जळगाव येथे सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थिनींना सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल मार्गदर्शन करून किशोरवयीन मुलींनी वयात येताना कोणती काळजी घेतली पाहिजे या विषयावर पीपीटी च्या माध्यमातून प्रबोधन केले. व विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन भेट दिले. याप्रसंगी भावना मगर, कादंबरी देशमुख, पोर्णिमा पाटील, रतना सूर्यवंशी, वैशाली पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.