<
जळगाव (प्रतिनिधी) – येथील सुहास पाटील हे त्यांच्या अनेक सामाजिक कार्यामुळे शहरात नावाजलेले आहेत.ते शनिवारी दि २० रोजी रात्री साडे बारा वाजता कामावरून घरी व्यंकटेश नगरला जात असताना,एक कैलास कसबे नावाचा युवक भर पावसात निराश स्थितीत चालत असल्याचे दिसून आले, त्यास सुहास पाटील यांनी विचारले असता कैलास ने सांगितले की तो जुने बसस्थानक च्या मागील बालाजी रेस्टॉरंट येथे कूक म्हणून कामाला असून आज रात्रीच कामाच्या ठिकाणावरून त्याची सायकल चोरीस गेली.तसेच याचे फुटेज देखील असल्याचे सांगितले. परंतु पावसामुळे व मध्य रात्री हरीविठ्ठल ला जाण्यासाठी रिक्षा पण नसते.रात्रीच्या वेळी लिफ्ट पण नाही मिळत व त्यात मोबाईल चा बॅलन्स ही संपलेला,म्हणून पायीच जातोय असे सांगितले. त्यानंतर सुहास पाटील यांनी त्या युवकास हरीविठ्ठल येथे त्याच्या घरीसोडले व त्यास आपल्या सामाजिक मित्र परिवाराकडून वर्गणी जमवून एक सायकल देण्याचे आश्वासन दिले. या बद्दल कैलास याने सुहास पाटील यांचे आभार मानले.एका होतकरू ला अर्ध्या रात्री मदतीचा हात दिल्याने सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.