<
स्वच्छता मोहिमेत आ.चंद्रकांत पाटील स्वतः झाले सहभागी
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून दि १२ जानेवारी रविवार रोजी आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रत्यक्ष सहभागाने शिवसेनेच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . सर्वात आधी रुग्णालयात स्वच्छता यशस्वीरीत्या संपन्न झालेवर तेथेच माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस डॉक्टर व कर्मचारी यांचेसह आ.पाटील यांनी माल्यार्पण केले व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आ. चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काय ? आणि कसे ? असते. सर्वसामान्य लोकांना लोकप्रतिनिधी आपणच आहोत याची चुणूक दाखविण्याचे त्यांचे पुरेपूर प्रयत्न वेगवेगळ्या कार्यशैलीतून दिसून येत आहेत . यातूनच शनिवारी शस्त्रक्रियेच्या आधुनिक साहित्यानी अद्यायवात अशा ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करतांना त्यांना येथे प्रचंड घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य दिसून आल्याने त्यांनी लागलीच राजमाता जिजाऊ ची जयंती या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून करण्याची सूचना शिवसैनिक व पदाधिकारी यांना दिली. बोले तैसा चाले… यानुसार कर्त्यव्य रुपात येऊन रविवार दि १२ रोजी सकाळीच आ.पाटील व शेकडो शिवसैनिक पदाधिकारी यांची टीम ” रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ” हे ब्रीद घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. निव्वळ बोट ठेवून कामे न करता स्वतः सहभागी होत कार्य तडीस नेण्याची हातोटी असलेल्या आ.चंद्रकांत पाटील यांनी सर्वात आधी रुग्णालयात साफसफाई मोहीम फत्ते केली. व मोठ्या उत्साहात डॉक्टर व कर्मचारी यांचेसह आमदार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच यानंतर तुषार बोरसे दत्तप्रभु कन्स्ट्रक्शन चे जेसीबी, ढंपर, रोडरोलर, ट्रॅक्टर आणि रोटरव्हेटर आधी साहित्य वापरून बाहेरील परिसर स्वच्छ केला. तसेच सहभागी झालेल्या शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकानी हातात झाडू घेऊन परिसर झाडून पुसून साफ केला .यात उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांची आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केल्याने रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सुज्ञ नागरिकांकडून आ.पाटील यांचे कौतुक होत आहे. प्रसंगी डॉ. योगेश राणे, डॉ. नम्रता अच्छा, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अँड मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, तालुका प्रमुख छोटू भोई, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, माजी सरपंच मुशीर मणियार, जाफर अली, जहीर शेख, सलीम खान, शकुर जमदार, विधानसभा संघटक अमरदीप पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, पिंटू पाटील, विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले, गटनेता राजेंद्र हिवराळे, महेंद्र मोंढाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, पंकज राणे, नामदेव भिल्ल, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, गौरव दुट्टे, सोपान मराठे, शुभम शर्मा, चेतन कांडेलकर, राजू कापसे, रितेश सोनार, स्वप्नील श्रीखंडे, गौरव काळे, मुकेश डवले, शुभम तळेले, मनोज मराठे प्रमोद सौंदळे, पप्पू मराठे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.